Summer Crop Sowing : उन्हाळी पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात

मका पिकाचे सरासरी क्षेत्र १७१० हेक्टर इतके असून १ हजार १३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६९२ हेक्टर आहे.
 Sowing
SowingAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात उन्हाळी पिकांची १ हजार ६१४ हेक्टरवर पेरणी (Summer Crop Swoing) झाली आहे. तर चारा पिकांची पेरणी ७४५ हेक्टरवर लागवड (Cultivation) झाली आहे.

जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. चारा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात भुईमूग, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी उन्हाळ्यात केली जाते. जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र ३ हजार ५१८ हेक्टर इतके आहे.

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांच्या पेरणीचे नियोजन केले असले तरी, ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची पेरणी केली आहे.

 Sowing
Summer Sowing : मराठवाड्यात ३३ हजार हेक्टरवर उन्हाळी पीके

मका पिकाचे सरासरी क्षेत्र १७१० हेक्टर इतके असून १ हजार १३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६९२ हेक्टर आहे. त्यापैकी ४५३ हेक्टवर भुईमुगाची टोकणी झाली आहे. तर उन्हाळी सोयाबीनची २७ हेक्टरवर पेरा झाला आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ, खानापूर आणि तासगाव या तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर असतो.

त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी मका, कडवळ यासह अन्य चारा पिकांची लागवड करण्यासाठी पुढे येतात. जत तालुक्यात मका २०३, कडवळ, १०१ आणि इतर चारा १२३ हेक्टरवर लागवड केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com