Seed Production : ग्रामबीजोत्पादनातून वाढले आदिवासी भागात सोयाबीन क्षेत्र

सोयाबीनचा सुधारित वाण ‘फुले संगम’ याचा स्वत:च्या क्षेत्रावर वापरून उर्वरित बियाणे म्हणून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केले आहे. त्यामुळे जवळपास ३००० हेक्टर क्षेत्र ‘फुले संगम’ या वाणाखाली आले आहे.
Soybean
SoybeanAgrowon

नाशिक : जिल्ह्यातील वडेल (ता. मालेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने कळवण या आदिवासी तालुक्यात सुधारित तंत्रज्ञानाचा (Improved Technology) वापर करून सोयाबीन पिकाची उत्पादकता (Soybean Crop Productivity) व क्षेत्र वाढविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. एकात्मिक पीक व्यवस्थापन (Integrated Crop Management) तंत्रज्ञानाचा वापर करून ज्याठिकाणी अर्ध्या ते एक क्विंटलपर्यंत उत्पादकता असलेल्या क्षेत्रात आठ ते दहा क्विंटलपर्यंत शेतकरी उत्पादन घेत आहे. सोयाबीनचा सुधारित वाण (Soybean Verity) ‘फुले संगम’ याचा स्वत:च्या क्षेत्रावर वापरून उर्वरित बियाणे म्हणून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केले आहे. त्यामुळे जवळपास ३००० हेक्टर क्षेत्र ‘फुले संगम’ या वाणाखाली आले आहे.

Soybean
Oil Seed Meal : तेलबियापेंड निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली

गळीतवर्गीय पिकांच्या उत्पादन व क्षेत्रवाढीच्या दृष्टिकोनातून भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत अटारी, पुणे संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०१९-२० मध्ये वडाळे हातगड (ता. कळवण) व मोहळांगी (ता. सटाणा) व २०२१-२२ यावर्षी बोरदैवत (ता. कळवण) येथे अनुक्रमे २० व १० हेक्टर इतक्या क्षेत्रावर ‘फुले संगम’ वाणाची लागवड करण्यात आली. प्रकल्पाची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राकडे होती. प्रकल्पाअंतर्गत ७५ लाभार्थी शेतकऱ्यांना गरजेच्या निविष्ठा पुरविण्यात आल्या. सहभागी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या अवस्थेनुसार एकात्मिक पीक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. पीकवाढीच्या काळातील निरीक्षणे नोंदविण्यात आली. तर बीजोत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

Soybean
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

मागील तीन वर्षामध्ये एकट्या वडाळे (हातगड) या गावामधून अंदाजे ८०० क्विंटल व बोरदैवत येथून २०० क्विंटल सोयाबीन बियाणे उत्पादित होऊन जवळपास ६० ते ७० गावांमध्ये विकण्यात आले. यामधून सर्वसाधारणपणे ३००० हेक्टर क्षेत्र ‘फुले संगम’ या वाणाखाली आल्याचे निदर्शनास आले.

प्रकल्पातील दोन वर्षाच्या तपशील

पीक...वाण...प्रकल्पात सहभागी शेतकरी..उत्पादन(क्विंटल/हेक्टर)...उत्पादन खर्च(रुपये/हेक्टर)...निव्वळ नफा(रुपये/हेक्टर)

सोयाबीन...फुले संगम...७५...१७.६८...२४,६२५...४०,९५४

(सोयाबीन पिकाचे दर संबंधित वर्षातील बाजारभावानुसार)

पूर्वी सोयाबीनचे एकरी १ ते २ क्विंटलपर्यंत उत्पादन होते; मात्र या प्रकल्पामुळे सोयाबीनची सरी-वरंबा टोकण पद्धतीने लागवड करता आली. पूर्वी जास्त पावसामुळे पीक खराब व्हायचे. परिणामी शेंगांचे प्रमाण कमी होते. आता उत्पादन वाढलेच; शिवाय बियाणे विकून प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये इतका फायदा झाला.
दत्तू काळू भोये, शेतकरी, वडाळे, ता. कळवण
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आम्हाला सोयाबीन पिकाचे प्रगत तंत्रज्ञान समजले त्यात टोकण पद्धतीने लागवड व ४ फुटावरील सारी वरंब्यावर प्रत्येकी दोन ओळी लागवड केल्या व आम्हाला पण आमच्या गटाच्या प्रगतीसाठी ग्रामबीजोत्पादन ही संकल्पना फायद्याची वाटली.
जयप्रकाश हिरामण चव्हाण, शेतकरी, बोरदैवत ता. कळवण
पीक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून बीज-प्रक्रिया केली गेली. बीजोत्पादन घेताना महत्त्वाच्या बाबी जसे विलागीकरन अंतर, भेसळ असलेली रोपे, वेगळी फुले पाने असलेली झाडे इत्यादी विशेष काळजी घेण्यात आली. या प्रकल्पात कृषी विभाग, कळवण यांची मदत झाली. या प्रकल्पामुळे ‘फुले संगम’ हा वाण तालुक्यातील व तालुक्याबाहेरील गावांमध्ये पोहोचला याचा आनंद आहे.
रुपेश खेडकर, विषय विशेषज्ञ-कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com