Soybean Producer : लातूर येथे शनिवारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा

Shetkari Melava : लातूरमधील बोरी येथे सकाळी साडे आठ ते साडे अकरा या वेळेत हा मेळावा होणार आहे.
Soybean
SoybeanAgrowo

Soybean Update : लातूर येथील राजा अमोघवर्ष शेतकरी उत्पादक कंपनी आणि पुणे येथील सिमेंटिक टेक्नॉलॉजीज ॲड ॲग्रीटेक सर्विसेस प्रा.लि. यांच्या वतीने शनिवारी (ता. २७) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Soybean
Soybean Production : सोयाबीन उत्पादन अन् गुणवत्ता वाढीच्या टिप्स

बोरी येथे सकाळी साडे आठ ते साडे अकरा या वेळेत हा मेळावा होणार आहे. यावेळी अचूक सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान आणि खरीप हंगामाची पूर्वतयारी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मेळाव्याला येणाऱ्या शेतकऱ्यांनी सोबत आपल्या शेतीतील मातीचा नमुना आणला तर त्यांना आकर्षक भेटवस्तू मोफत देण्यात येईल, असेही आयोजकांनी कळवले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com