Bajara Crop : खानदेशात बाजरी पिकात आंतरमशागतीला वेग

खानदेशात सात हजार हेक्टरवर पीक; खते देण्यासह तणनियंत्रणही सुरू
Bajara Sowing
Bajara Sowing Agrowon

Jalgaon Millet News : खानदेशात उन्हाळ पिकांत बाजरीची पेरणी (Bajari Sowing) अधिक आहे. कांदा (Onion), सूर्यफूल (Sunflower) या पिकांपेक्षा अधिक लागवड (Cultivation) बाजरीची झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक एक महिन्याचे झाले आहे. त्यात आंतरमशागत, खतांची एक मात्रा शेतकऱ्यांनी दिली आहे.

बाजरीत तणनाशकांचा उपयोग शेतकरी करीत नसल्याचे चित्र आहे. यामुळे मजुरांकरवी तणनियंत्रण करून घेत आहेत. उन्हाचा चटका वाढण्यापूर्वीच तणनियंत्रण, आंतरमशागत व दोन-तीनदा सिंचन पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

कारण उन्हाचा चटका वाढल्यानंतर मजूर उपलब्ध होणे कठीण होईल. तसेच सिंचनासाठी पाणीही अधिक लागेल. यामुळे अनेकांनी पेरणी १० जानेवारी ते १५, १८ जानेवारी दरम्यान केली होती.

या कालावधीत थंडी अधिक होती, परंतु शेतकऱ्यांनी जमीन, वाण निवड आणि पेरणीसंबंधी काटेकोर व्यवस्थापन केले. तसेच ठिबकवर अनेकांनी लागवड केली. अशा शेतकऱ्यांच्या बाजरीची उगवण चांगली झाली असून, पिकात एकदा आंतरमशात पूर्ण झाली आहे.

अनेकांनी काळ्या कसदार जमिनीत बाजरीची पेरणी केली आहे. या क्षेत्रात पिकाची वाढ चांगली आहे. तर काहींनी मध्यम, हलक्या जमिनीत ठिबकवर पेरणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उशिराच्या कांदेबाग केळीत पेरणी केली आहे.

या केळीची काढणी जानेवारीत ९५ टक्के पूर्ण झाली. यानंतर किरकोळ मशागत करून त्यात शेतकऱ्यांनी ठिबकवर बाजरीची पेरणी केली आहे.

Bajara Sowing
Millet Cultivation : ‘कृषी’चा ज्वारी, बाजरी लागवडीवर ‘फोकस’

खानदेशात सुमारे सात हजार हेक्टरवर बाजरी पीक आहे. बाजरीचे दर सध्या सरासरी २४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. वर्षभरापासून दर टिकून आहेत. तसेच चाऱ्यासही उठाव आहे.

जळगाव जिल्ह्यात जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, चोपडा, यावल, धुळ्यात धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात समान क्षेत्रात पेरणी झाल्याची माहिती आहे. तर नंदुरबारातही नंदुरबार, शहादा, नवापूर तालुक्यात बाजरी पीक अधिक आहे.

काही शेतकऱ्यांनी काळ्या कसदार जमिनीत पाट पद्धतीने सिंचनास पसंती दिली आहे. कारण काळ्या कसदार जमिनीत १० ते १२ दिवसांत एकदाच सिंचनासाठी पाणी लागते.

चाऱ्यासाठीही बाजरीचा उपयोग

बाजरीचा चारा सकस मानला जातो. हिवाळ्यात किंवा थंड तापमान असताना दुधाळ पशुधनास बाजरीचा चारा दूध उत्पादक शेतकरी खाऊ घालतात. यामुळे चाऱ्यास मागणी कायम आहे. चारा व धान्यही एकरी किमान नऊ क्विंटल मिळते.

खर्च मका, गहू आदी पिकांपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी बाजरीला पसंती दिली आहे. केळी पट्ट्यात बाजरीची पेरणी अधिक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com