Papaya Cultivation: पपई पिकात आंतरमशागतीला वेग

फेब्रुवारीत ज्यांनी लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पपई पिकात आंतरमशागत किंवा तणियंत्रण, खते दिली जात आहेत.
Papaya Crop
Papaya CropAgrowon

Jalgaon News : खानदेशात पपई पिकाची लागवड (Papaya Crop Cultivation) यंदा सुमारे २०० हेक्टरने वाढली आहे. पीक जोमात असून, त्यात सध्या तणनियंत्रणासह खते देण्याचे काम सुरू आहे.

पपई पीकही रोगराईच्या दृष्टीने नाजूक मानले जाते. प्रतिकूल वातावरणात रोगांना पीक लवकर बळी पडते. यामुळे निश्‍चित खते, किडनाशकांची मात्रा दिली जात आहे. तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रकोप टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाहीदेखील केली जात आहे.

शेत तणमुक्त ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपईची लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ धुळे व जळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे सहा हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली आहे. फेब्रुवारीच्या मध्यात लागवड सुरू झाली.

एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत लागवड सुरू होती. लागवड गादीवाफा व ठिबक सिंचन तंत्राच्या मदतीने झाली आहे. १० बाय सहा, १० बाय सात फूट या अंतरात लागवड झाली आहे.

Papaya Crop
Papaya Rate : खानदेशात खरेदीदारांकडून पपई दर पाडण्याचा प्रयत्न

काही शेतकरी अद्यापही लागवड करीत आहेत. पीक सध्या बरे आहे. फेब्रुवारीत ज्यांनी लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पपई पिकात आंतरमशागत किंवा तणियंत्रण, खते दिली जात आहेत.

अनेक शेतकरी विद्राव्य खते देत आहेत. त्यात उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी कलिंगडाचे आंतरपीकही घेतले. पिकाची वाढ मेनंतर जोमात सुरू झाली.

एकदा बेसल डोस दिल्यानंतर शेतकरी ठिबकद्वारे विद्राव्य खते देत आहेत. तसेच चार महिन्यांच्या पिकात तीनदा फवारण्यादेखील शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत. पपईचे दर गेल्या हंगामात अस्थिर होते. परंतु पीक अनेकांना परवडले. यामुळे लागवड वाढली आहे.

Papaya Crop
Papaya Rate : खानदेशात पपई दर स्थिर

पिकात ऑगस्टअखेर फुले लागण्यास सुरुवात होईल. पुढे ऑक्टोबरमध्ये नंदुरबार, जळगावमधील मुक्ताईनगर, चोपडा भागात काढणी सुरू होईल.

सध्या पीक एक ते दोन महिन्याचे आहे. त्यात काहींनी आंतरपीकही घेतले आहे. यामुळे पिकाचे उन्हापासून संरक्षण होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com