Grape Cutting : नाशिकमध्ये द्राक्षबाग एप्रिल खरड छाटणीला वेग

महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात कांदा, द्राक्ष, ऊस, मका, सोयाबीन, टोमॅटो अशी नगदी पिके घेतली जातात.
Garpe Orchard Cutting
Garpe Orchard CuttingAgrowon

Nashik News : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात कांदा (Onion), द्राक्ष (Grape), ऊस (Sugarcane), मका (Maize), सोयाबीन (Soybean), टोमॅटो (Tomato) अशी नगदी पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणारे पीक म्हणून द्राक्ष आणि कांदा या पिकाकडे बघितले जाते.

सध्या रब्बी हंगाम सुरू असून, तालुक्यात उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागांमध्ये (Grape Orchard) एप्रिलच्या खरड छाटणीला वेग आला आहे.

द्राक्षबागेतल्या फळ छाटणी अवस्थे अगोदर सर्वात महत्वाची अवस्था म्हणजे खरड छाटणी होय. कारण खरड छाटणी व्यवस्थापन योग्यरित्या झाले, तरच फळ छाटणी कामकाजाला महत्व आहे. द्राक्षातील खरड छाटणीस फळ छाटणीचा पाया म्हणतात.

थोडक्यात एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर बागेची योग्य ती काळजी घेतली जाते.

Garpe Orchard Cutting
Grape Crop Damage : लासलगावात निर्यातक्षम द्राक्ष बाग भुईसपाट

खरड छाटणीनंतर फुटून आलेल्या नवीन फुटीतील योग्य ती फुट राखणे, अतिरिक्त फुटींची विरळणी करणे, दोन फांद्या, काड्यांमधील योग्य अंतर राखणे, वेळेवर सबकेन करणे, सबकेनच्या पुढील शेंडा योग्य वेळी मारणे, काडीवरील पानांची संख्या नियोजन करणे, अन्नद्रव्यांचा व्यवस्थीत पुरवठा करणे, वेलीस रोग व किड यापासून नियंत्रणात ठेवणे, काडी पक्वता निर्मिती योग्य नियोजन करणे यासारख्या अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश होतो.

यानंतर काडी चांगली परिपक्व होत जाते. काड्यांची परिपक्वता होण्यासाठी खरड छाटणीपासून साधारणतः १४० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो. खरड छाटणीनंतर बागेत सुप्त घड निर्मितीसाठी व त्यांच्या विकासासाठी आवश्यक असे पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे असते.

द्राक्ष बागेतील एप्रिल खरड छाटणीनंतर केल्या जाणाऱ्या शेतीच्या अंतर्गत व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. कारण हा फळ छाटणीचा पाया समजला जातो. त्यामुळे यानंतरचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. द्राक्षपंढरीत द्राक्षाची काढणी युद्ध पातळी सुरू आहे. द्राक्ष काढणीनंतर साधारणतः १५ ते २० दिवसाच्या विश्रांतीनंतर खरड छाटणीला सुरुवात केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com