Crop Damage Survey : पीक नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यांना गती

अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nandurbar News : तळोदा तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू (Wheat Crop), हरभऱ्यासोबतच (Chana) केळी आदी (Banana Crop) पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.

यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून पंचनामे (Crop Damage Survey) करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास गती दिली आहे.

तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा, सिलिंगपूर, मोहिदा, रोझवा पुनर्वसनसह अनेक गावांमध्ये रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला होता.

त्यामुळे रब्बीत चांगले उत्पन्न घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला होता. अवकाळी पावसामुळे परिपक्व झालेले गहू पीक सर्वत्र आडवे पडल्याचे चित्र दिसून येत होते.

त्याचबरोबर कापण्यात आलेले हरभरे व परिपक्व झालेले हरभरे यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला होता.

Crop Damage
Banana Orchard Damage : वाशिंबे परिसरात वादळी वाऱ्याने केळी बागा जमीनदोस्त

वादळी वाऱ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचे खांबही कोसळले होते. इतर पिकांना देखील अवकाळीचा चांगलाच फटका बसला होता.

त्यामुळे बळीराजा हतबल झाला होता आणि संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी यानिमित्ताने शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत होती.

तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, ठिकठिकाणी स्वतः शेतकरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना आपापल्या शेतात घेऊन जात, झालेले नुकसान दाखवत आहेत.

त्याप्रमाणे कृषी विभागाकडून देखील पंचनामे करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. रांझणी परिसरात कृषी पर्यवेक्षक पी. आर. दळवी, कृषी सहाय्यक मनीषा सोनी, तलाठी जयवंत पाडवी यांच्यासह कर्मचारी पंचनामे करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

तसेच इतर भागांत देखील संबंधित अधिकारी व कर्मचारी पंचनामे करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता पंचनामे झाल्यानंतर तत्काळ नुकसानभरपाई मिळण्याची आस लागून राहिलेली आहे.

Crop Damage
Chana Procurement : ...तर खरेदी केंद्रांना ब्लॅक लिस्ट करू ः अनुपकुमार

नुकसानीचे सरसकट पंचनामे करा - आमदार ॲड के. सी. पाडवी

अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई झालेल्या क्षेत्राचे पंचनामे तत्काळ करण्यात येऊन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात यावा.

तसेच नुकसान भरपाईसंदर्भात असलेल्या शासनाच्या नियमांमध्ये शिथिलता देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com