Water Transport : जलवाहतुकीच्या कामास गती द्या

ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महापालिका क्षेत्रांना जोडणाऱ्या जलमार्गासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमार्फत प्रवासी जेट्टी उभारण्यात येत आहेत.
Water Transport
Water TransportAgrowon

Thane News : ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महापालिका क्षेत्रांना जोडणाऱ्या जलमार्गासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमार्फत प्रवासी जेट्टी उभारण्यात येत आहेत. या कामांची स्थिती आणि चौपाटीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

जलवाहतुकीच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश खासदार राजन विचारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांना दिले आहेत.

Water Transport
Road Development Fund : सरकारने धुळ्यातील मंजूर रस्त्यांबाबतची स्थगिती उठविली

राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक ५३ मधील पहिल्या टप्प्यातील कोलशेत, काल्हेर, मिरा-भाईंदर, जैसल पार्क, तसेच डोंबिवली येथे जेट्टीची कामे सुरू करण्यास विलंब का होत आहे, असे विचारण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी सांगितले, की या जेट्टीची कामे सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे.

तसेच राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक ५३ अंतर्गत टप्पा दोनमधील ऐरोली येथे जैवविविधता केंद्र येथे असणारी जेट्टी विकसित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

‘भाईंदर ते वसई रो-रो सेवा जूनपर्यंत सुरू करू’

भाईंदर ते वसई रो-रो सेवा सुरू करण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. वसई येथील जेट्टीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून जून अखेरपर्यंत जय भवानी कंपनीमार्फत बोट सेवा सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. भाईंदर ते वसई रो-रो बोट सेवेचा एक थांबा डोंगरी चौक जेट्टीवर घेण्याचाही विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com