Siddheshwar Sugar Mill : ‘सिद्धेश्वर’चे स्पेंट वॉश उघड्यावर

सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरल्याच्या कारणावरुन चर्चेत असलेला कुमठे येथील सिध्देश्‍वर साखर कारखाना पुन्हा एकदा वेगळ्या कारणावरुन चर्चेत येण्याची शक्यता आहे.
Siddheshwar Sugar Mill
Siddheshwar Sugar MillAgrowon

Solapur Industrial News : सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरल्याच्या कारणावरुन चर्चेत असलेला कुमठे येथील सिध्देश्‍वर साखर कारखाना पुन्हा एकदा वेगळ्या कारणावरुन चर्चेत येण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे, तर या कारखान्याच्याविरोधात कारवाईसाठी संबंधित यंत्रणांकडे तक्रारदेखील केली जाणार आहे.

या कारखान्याच्या एका नव्या प्रकरणाचा अंक आता समोर आणला गेल्याचे मानले जात आहे. उघड्यावर टाकण्यात आलेले ‘स्पेंट वॉश’ हेच ते या कारखान्याचे नवे प्रकरण. ज्या ‘स्पेंट वॉश’मुळे संबंधित परिसरात प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय या भागामधील पाण्याचे स्त्रोत बिघडू शकतात.

स्पेंट वॉशची योग्य प्रकारे साठवूणक आणि विल्हेवाट न केल्याचा आक्षेप या कारखान्यावर लावण्यात आला आहे. कारखान्याचे माजी तज्ज्ञ संचालक संजय थोबडे यांनी हे नव्याने प्रकरण समोर आणत त्यांनीच कारखान्यावर स्पेंट वॉशबद्दल बेफिकीरपणाचा आरोप लावला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप या प्रकरणात श्री थोबडे यांनी केला आहे. तसेच प्रदूषण वाढविण्यात अत्यंत घातक ठरणाऱ्या कारखान्याच्या स्पेंट वॉशप्रकरणाची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रीकरण प्रसारमाध्यमांना पाठविण्याबरोबरच संबंधित यंत्रणाकडे या प्रकरणात कारखान्यावर कारवाई होण्यासाठी इ मेलद्वारे तक्रार करणार असल्याचे संजय थोबडे यांनी माध्यमांना सांगितले आहे.

खास करुन बाब म्हणजे या कारखान्याच्या या प्रकरणातील कारवाईबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे सोमवार (ता.१६) विचारणा करणार असल्याचेही थोबडे म्हणाले. शुक्रवार (ता.१४ ) या कारखाना स्थळावर पाहणी केली असता स्पेंट वॉशचे प्रकरण दृष्टिस पडल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

Siddheshwar Sugar Mill
Crop Damage In Solapur : सोलापुरात ‘वादळी’ने २६ गावातील १११.४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

श्री सिध्देश्‍वर साखर कारखाना अद्याप सुरु असल्यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले होते. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, संजय थोबडे यांनी कारखाना चालू आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष कारखाना स्थळावर जाऊन पाहणी केली असता, त्यांना कारखान्याचे गाळप बंद असल्याचे दिसले.

मात्र दुसरीकडे स्पेंट वॉशचे गंभीर प्रकरण त्यांच्या नजरेस आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या कारखान्याचे गाळप बंद झाल्यावर कारखान्याच्या को- जेनरेशनच्या चिमणीच्या पाडकामाबाबत महापालिका आयुक्त कारवाई करतील असे काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

त्यातून कारखाना लक्षवेधी असताना श्री थोबडे यांनी या कारखान्याचे वेगळेच गंभीर प्रकरण समोर आणल्याचे मानले जात आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होणार? याचे औत्सुक्य राहणार आहे.

प्रसिद्धीस देण्यात आलेली छायाचित्रे आणि व्हिडीओची सतत्या पडथाळून पाहणे आवश्यक आहे. एकाद्याचीच बदनामी करण्यासाठी काही षडयंत्राचाही भाग असून शकतो.
धर्मराज काडादी, मार्गदर्शक संचालक, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना,कुमठे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com