मध्य प्रदेशातील बोगस बियाण्यांची विक्री थांबवा

पालकमंत्री पाटील : खरीपपूर्व हंगाम बैठक, जूनमध्येच कापूस पेरा
Bogus Seed Sell
Bogus Seed SellAgrowon

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये बोगस बियाणे (Bogus seed), खतांचे (Fertilizer) प्रमाण वाढले आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात मध्य प्रदेशातून बोगस बियाणे (Bogus Seed Sale) येते. त्याचा बंदोबस्त कृषी विभागाने करावा, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. गुलाबी बोंड आळीपासून होणारे कपाशीचे नुकसान टाळण्यासाठी जून महिन्यातच कपाशी पेरणी करावी, असा सल्लाही शेतकऱ्यांना त्यांनी दिला. जिल्हा नियोजन भवनात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, लता सोनवणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत दळवी, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता वाय. के. भदाणे, प्रकल्प उपसंचालक के. एल. तडवी, आत्मा समितीचे अध्यक्ष पी. के. पाटील, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रभारी प्रमुख डॉ. संजीव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी प्रमुख महेश महाजन आदी उपस्थित होते.

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया, कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर करावा. एक गाव- एक वाणअंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीवर भर द्यावा. पंचसूत्रीचा वापर केल्यास शेतकरी अधिक चांगल्या पद्धतीत पिके घेऊ शकतील. मान्यवरांच्या हस्ते बॅनर, पोस्टर आणि घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. यात जिल्हा कृषी कार्यालयाचा अहवाल, कृषी विकास अधिकारी, जळगाव यांनी तयार केलेली पत्रिका, कृषी विभाग व ममुराबाद कृषी विज्ञान केंद्र यांच्या घडीपत्रिका आदींचे प्रकाशन करण्यात आले.

पुरस्कारार्थींचा सत्कार

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या दिनेश बोरसे (चिंचखेड, ता. चाळीसगाव), केळी प्रक्रिया, कामिनी साळुंखे (कोळन्हावी, ता. यावल)- दुग्ध प्रक्रिया, पिंप्री खुर्द (ता. धरणगाव) येथील चंद्रकांत चौधरी- पापड उद्योग यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत जळके (ता. जळगाव) येथील अनिता पाटील यांना दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com