Crop Damage In Satana : वादळी पावसाचा सटाणा तालुक्याला पुन्हा दणका

Hailstorm Update : मागील एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे सटाणा तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते.
Crop Damage In Satana
Crop Damage In SatanaAgrowon

Nashik News : मागील एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे सटाणा तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये प्रामुख्याने काढणीस आलेला उन्हाळ कांदा, टोमॅटो, डाळिंब, मिरची, छाटलेल्या द्राक्षबागा यासह इतर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

या संकटाच्या झळा अजूनही कायम असतानाच सोमवारी (ता. २२) पुन्हा एकदा तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

चालू महिन्यात उन्हाचा चटका तीव्र असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. जवळपास ४० अंश सेल्सिअसवर तापमान स्थिरावले आहे. असे असतानाच सटाणा तालुक्यातील दक्षिण भागातील ठेंगोडा परिसरात जोरदार वादळीवाऱ्याची स्थिती होती.

परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर शेतकऱ्यांनी कांदा झाकण्यासाठी कांदा चाळीवरील टाकलेले कागद उडून गेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात साठवणुकीची क्षमता कमी असल्याने कांदा उघड्यावर पडला आहे.

Crop Damage In Satana
Crop Disease-Pest Control : पीक पोषणासह किडी-रोग नियंत्रणात सूक्ष्मजीवांचे महत्त्व

मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कांदा पावसात पुन्हा भिजला आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यासह शेती शिवारातील शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे सोबत दूरवर उडून गेले होते. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. लखमापूर, ब्राह्मणगाव, धांद्री, वायगाव, नामपूर, खिरमाने परिसरात जोरदार सरी बरसल्या. यामध्ये लखमापूर, धांद्री परिसरात जोराच्या सरीवर असल्याने मशागत करून ठेवलेल्या शेतामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कोंडी केली आहे.

शेतकरी म्हणतात, अगोदरचे नुकसान सोसवेना

मागील महिन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे सटाणा तालुक्यातील कांदा व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाली. या वेळी अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन पाहणी करून गेले. आठ दिवसांत मदत दिली जाईल, असे जाहीर केले; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप कुठलीही मदत पडली नाही.

वाचलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून तो बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे. अशातच नैसर्गिक आपत्तीचा सातत्याने तडाखा बसत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अगोदरचे नुकसान सोसवेना असा सूर शेतकऱ्यांमधून येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com