Hingoli Crop Damage : हिंगोलीत वादळी पावसाचा ५ हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा

शनिवारी (ता. १८) दुपार नंतर जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
Crop Damage News
Crop Damage NewsAgrowon

Hingoli Weather News : जिल्ह्यात शनिवारी (ता. १८) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवेळी पावसात गारपीट झाली.

प्राथमिक अंदाजानुसार हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या ४ तालुक्यांतील १३ हजार शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपीके मिळून एकूण ५ हजार ६०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

Crop Damage News
Crop Loan : शेती कर्जांना ‘सिबिल’मधून वगळण्यास रिझर्व्ह बॅंकेचा नकार

शनिवारी (ता. १८) दुपार नंतर जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

शेतातील उभ्या तसेच सुगी सुरु असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा आदी जिरायती पिके, केळी, हळद, कांदा, टोमॅटो यासह विविध भाजीपाला आदी बागायती पिके संत्रा, मोसंबी, आंबा, टरबूज, खरबूज आदी फळपीकांना मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १ हजार ५५६ हेक्टरवरील जिरायती पिके, ३ हजार ५८६ हेक्टरवरील बागायती पिके, ४६१ हेक्टरवरील फळपिके मिळून एकूण ५ हजार ६०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com