Shekhar Gaikawad : कथा घरातल्या कुळाची

हैबती नावाचा एक शेतकरी आपली वडिलोपार्जित जमीन कसत होता. कोरडवाहू जमीन असल्यामुळे जमिनीतून हैबतीला निश्‍चित असे उत्पन्न येत नसे. घरात हैबतीची आई, बायको आणि तीन मुले हे सुद्धा शेतात वेळ मिळेल तेव्हा राबत असत.
Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon

हैबती नावाचा एक शेतकरी (Farmer) आपली वडिलोपार्जित जमीन (Agriculture Land) कसत होता. कोरडवाहू जमीन (Dry Land Agriculture) असल्यामुळे जमिनीतून हैबतीला निश्‍चित असे उत्पन्न येत नसे. घरात हैबतीची आई, बायको आणि तीन मुले हे सुद्धा शेतात वेळ मिळेल तेव्हा राबत असत.

दर दोन ते तीन वर्षाआड आलेल्या दुष्काळामुळे (Drought) शेतीतून कोणतीच प्रगती होईना. हे लक्षात आल्यावर हैबतीने पोट भरण्यासाठी शहरात जाऊन राहण्याचा विचार केला. सर्व शेतजमीन हैबतीचा भाऊ अनिल हा कसत होता.

अशी सुमारे १५-२० वर्षे उलटली. अनिल आता म्हातारा झाला होता, त्याची मुले जमीन कसू लागली.

Indian Agriculture
Indian Agriculture : आभाळ मायेची सय

त्या गावातील लोक त्या मुलांना म्हणायला लागले, की अरे, तुम्ही कष्ट करता अन् जमिनीला नाव तर चुलत्याचं? असे मुलांच्या लक्षात आल्यावर त्या मुलांना जमिनीची हाव सुटली आणि त्यांनी जमिनीच्या वहिवाटीला आपली नावे लावून घेतली आणि कूळ काही लोकांच्या सांगण्यावरून असल्याचा दावा पण दाखल केला.

हा सगळा प्रकार झाल्यानंतर त्यांचेच नातेवाईक त्यांना म्हणायला लागले, की अरे, ही जमीन तुमच्याच चुलत्याची आहे! त्याला तुम्ही फसवता कशाला? शेवटी काही काळानंतर त्यांनी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल आला.

त्या निकालपत्रात असे म्हटले होते, की घरातला माणूस कूळ होऊ शकत नाही! तब्बल पाच वर्षे खटला चालल्यावर शेवटी त्या मुलांची चूक त्यांच्या लक्षात आली.

तात्पर्य असे, की संयुक्त कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींनी जमीन कसली तर ती जमीन मूळ खातेदाराने स्वत:च कसली असे कूळ कायदा मानतो. अनेक वेळा एका चांगल्या उद्देशासाठी निर्माण झालेल्या कायद्याचा उपयोग काही हितसंबंधी लोक अशा चुकीच्या पद्धतीने करून घेतात.

कायदा आणि त्यामागे वर्षानुवर्षे चालत आलेले शहाणपण विचारात घेऊनच माणसाने पावले टाकली पाहिजेत.

‘माणूस आणि मालमत्ता’ या विषयाचा अभ्यास करताना कधी कधी कायद्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने सगळ्यांचे जे चांगले होईल त्यातच आपले शहाणपण मानणे उपयुक्त ठरते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com