Jadutona Virodhi Kayada : जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करा

Anti-Witchcraft Act : जादूटोणा, अघोरी प्रथा या समाजासाठी घातक असून राज्यात असले प्रकार वाढता कामा नये यासाठी अस्तित्वात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.
Anti-Witchcraft Act
Anti-Witchcraft ActAgrowon

Solapur News : जादूटोणा, अघोरी प्रथा या समाजासाठी घातक असून राज्यात असले प्रकार वाढता कामा नये यासाठी अस्तित्वात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.

तसेच जादुटोणा विरोधी कायदाबाबत जनसामान्यांना विविध माध्यमातून माहिती देण्यासाठी अधिक जनजागृतीबाबत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या.

जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सहा. आयुक्त नागनाथ चौगुले, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलिस निरिक्षक सुहास जगताप, उपस्थित होते.

Anti-Witchcraft Act
Farmers Union Elections : पाचोरा शेतकरी संघाच्या निवडणुकीत ‘मविआ’ उतरणार

राज्यात जादूटोणा, अनिष्ट व अघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

तसेच या कायद्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असून, जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार व प्रसारा सोबतच कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

अनिष्ट प्रथा परंपरा व जादूटोणा समाजाच्या प्रगतीत मोठा अडथळा निर्माण करतात. यासाठी समाजाने सुद्धा प्रत्येक घटनेकडे जागृक नागरिक म्हणून पहावे असेही ठोंबरे यांनी सांगितले.

तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करण्यासाठी नेमलेल्या समितीत विभागीय समन्वयक म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्तीचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com