Minister Dr. Vijayakumar Gavit : शेतीला चोवीस तास विजेसाठी प्रयत्नशील

नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्राच्या भूमीपूजन कार्यक्रम झाला.
Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon

Nandurbar News : जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला चोवीस तास वीज उपलब्ध (Electricity Available) होण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार, असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Minister Dr. Vijayakumar Gavit ) यांनी केले आहे.

नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्राच्या भूमीपूजन कार्यक्रम झाला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जि. प. सदस्य सुनील गावित, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जि. प. सदस्य भरत गावित, सरपंच रशीला वळवी, (पाटीबेडकी ), जयराम कुवर (दापूर ) रमेश गावित (करंजी ब्रु), काशिराम गावित (कामोद), उपसरपंच स्वप्नील गावित, तहसीलदार मंदार कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी, कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग अनिरुद्ध नाईकवाडे आदी उपस्थित होते.

Agriculture Pump
Agriculture Electricity : धारूळ रामापूर विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करा

पुरेशी वीज उपलब्ध होणार

शेतीला पाणी देण्यासाठी विजेची गरज लक्षात घेऊन वीजेचा अखंडरीत्या पुरवठा करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी नवीन वीज केंद्र उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यानुसार पाटीबेडकी येथील ३३/११ के. व्ही. उपकेंद्र येथे ३ फिटर कार्यान्वित होणार असून २ फिटर हे शेतीसाठी व १ फिटर हे घरगुती विजेसाठी उपलब्ध होणार आहे.

हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यावर या परिसरातील कोळदा, सुळी, सोनखडका, करंजी, पाटी, पाटीबेडकी, पिपराण, बोरपाडा, वडखुट, कामोद, खोकसा, बोमदीपाडा येथील नागरिकांना घरगुती व शेतीला पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होणार आहे. असेही डॉ. गावित यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com