Pomogranate Biomineral : डाळिंबामध्ये बायोमिनरल खत वापराचा अभ्यास

बायोमिनरल खत वापराचे तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक असून, त्यांच्यामध्ये रासायनिक खतांचा विशेषत: डाळिंबाच्या बागांमध्ये फॉस्फेटिक आणि पोटॅशिअमयुक्त खतांचा वापर कमी करण्यासाठी क्षमता आहे.
pomogranate
pomogranateAgrowon

डॉ. आशिष माइती, डॉ. राजीव मराठे, युवराज शिंदे

बायोमिनरल खतांचा ( Biomineral Fertilizers) वापर केल्याने डाळिंब फळधारणा आणि फळवाढीच्या अवस्थेमध्ये जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश यांची उपलब्धतता लक्षणीयरीत्या वाढते.बायोमिनरल खत वापराचे तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक असून, त्यांच्यामध्ये रासायनिक खतांचा विशेषत: डाळिंबाच्या बागांमध्ये फॉस्फेटिक आणि पोटॅशिअमयुक्त खतांचा वापर कमी करण्यासाठी क्षमता आहे.

pomogranate
Fertilizer Management : डाळिंब बागेत बायोमिनरल खतांचा संतुलित वापर

फॉस्फेट आणि पोटॅशिअम उपलब्ध करून देणारे हे बायोमिनरल खत फॉस्फेट आणि पोटॅशिअम विरघळवणारी बुरशीच्या (पेनिसिलिअम पिनोफिलम) बीजाणूंना पोटॅशिअम फेल्डस्पार आणि रॉक फॉस्फेट या खनिजच्या (२:१) प्रमाणात मिश्रण बनवून विकसित केले आहे. सुधारित बायो मिनरल खताचा वापर डाळिंब बागेमध्ये केला असता, जमिनीतील डाय-हायड्रोजनेज, आम्ल आणि अल्कलीधर्मी फॉस्फेट आणि मातीतील सूक्ष्म जैविक बायोमास आणि सेंद्रिय कार्बन आदींवर या खताचा सकारात्मक प्रभाव दिसून आला आहे.

एकाच प्रकारच्या बुरशीचा (पेनिसिलिअम पिनोफिलम) उपयोग केलेल्या फॉस्फोरस आणि पोटॅशिअम विरघळवणाऱ्या जैविक मिश्रणाच्या तुलनेत सुधारित बायोमिनरल खतांमुळे जमिनीतील एन्झाइमच्या क्रिया आणि सूक्ष्म जैविक बायोमास यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब यामध्ये अधिक सुधारणा दिसून आली आहे.

 बायोमिनरल खताच्या वाढत्या प्रमाणासह जमिनीतील एन्झाइमच्या क्रिया आणि सूक्ष्म-जैविक कार्बनचे प्रमाण वाढलेले दिसून आले.

pomogranate
आफ्रिकन कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान वापराचा होतोय अभ्यास

बायो-मिनरल युक्त खतांचा वापर सर्वाधिक प्रमाणामध्ये, जसे की ६०० ग्रॅम प्रति झाड एवढा केल्यामुळे जमिनीतील त्याच्या क्रिया व कर्बाचे प्रमाण हे त्याच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचलेले दिसून आले आहे. याउलट शिफारस केलेल्या फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीतील एन्झाइमच्या क्रिया किंवा सूक्ष्म जैविक कर्ब यांच्या प्रमाणामध्ये घट झालेली दिसून आली. यावरून असे दिसून येते की, डाळिंब बागेतील बायोमिनरल खताचा वापर हा केवळ जमिनीमध्ये सक्रिय सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतो तसेच खनिजांचे सेंद्रिय पोषक तत्त्वांमध्ये रूपांतरित करण्याची क्रिया देखील वाढवते. विशेषत: फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त एन्झाइमच्या क्रियामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आलेल्या आहेत.

pomogranate
Pomogranate Production : डाळिंब फळाच्या उत्पादनाला फटका

निष्कर्ष

 विविध प्रयोगांती असे दिसून आले, की प्रति झाड १५० ग्रॅम या प्रमाणे बायोमिनरल खताचा वापर केल्याने १.८५ : १ असे लाभ:खर्च गुणोत्तर वाढलेले दिसून आले. जे शिफारस केलेल्या फॉस्फेट आणि पोटॅशिअमयुक्त रासायनिक खतांच्या पारंपारिक व्यवस्थापन पद्धतींपेक्षा (लाभ:खर्च गुणोत्तर १.४१ : १) अधिक आहे.

 या तंत्रज्ञानाचा अवलंब डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केल्यास त्यांना निश्चितच फायदा होतो.

 बायोमिनरल खत वापराचे तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्यांच्यामध्ये रासायनिक खतांचा विशेषत: डाळिंबाच्या बागांमध्ये फॉस्फेटिक आणि पोटॅशिअमयुक्त खतांचा वापर कमी करण्यासाठी क्षमता आहे.

हे फॉस्फेट आणि पोटॅशिअम पूरक बायोमिनरल खत हे सेंद्रिय डाळिंब उत्पादन पद्धतीमध्ये उपयुक्त असून रासायनिक अवशेष मुक्त उत्पादन निर्मितीमध्ये हा एक महत्त्वाचा स्रोत होऊ शकतो.

बायोमिनरल खतांचा फुलधारणा, फळ धारणा आणि फळ उत्पादनावर होणारा परिणाम

 पेनिसिलियम पिनोफायलम आधारित पोटॅशिअम विरघळणारे जैविक मिश्रण आणि बायोमिनरल खताचा जमिनीमध्ये वापर केल्याने झाडांमध्ये नर आणि द्वि-लैंगिक फुलांची संख्या वाढलेली दिसून येते.

डाळिंब झाडामध्ये फुलधारणेसाठी बायोमिनरल खताचा प्रतिसाद हा पोटॅशिअम विरघळणाऱ्या जैविक मिश्रणापेक्षा आणि शिफारस केलेल्या फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या प्रमाणापेक्षा अधिक चांगला होता. परिणामी, पोटॅशिअम विरघळवणारे जैविक मिश्रण आणि बायोमिनरल खत या दोन्हींमुळे डाळिंब फळांच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा झालेली दिसून आली.

 निरीक्षणाअंती फळ उत्पन्नाच्या माहितीवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की पेनिसिलियम पिनोफायलम आधारित बायोमिनरल खत डाळिंबातील आर्थिक फळ उत्पादनाशी तडजोड न करता फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांची आवश्यकता पूर्णपणे बदलू शकते.

बायो मिनरल खतांचा जमिनीतील उपलब्ध पोषक घटकांवर होणारा परिणाम

बायोमिनरल खतांचा वापर केल्याने डाळिंब फळधारणा आणि फळवाढीच्या अवस्थेमध्ये जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश यांची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढते.

 बायोमिनरल खताचा वापर अधिक प्रमाणात (म्हणजे ६०० ग्रॅम प्रति झाड) केल्यास उपलब्ध नत्राचे प्रमाण सर्वाधिक नोंदवले गेले आहे. तर, पोटॅशियम विरघळवणाऱ्या जैविक मिश्रणामुळे आणि बायोमिनरल खतांचा वापर केलेल्या जमिनीमध्ये उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण शिफारस केलेल्या मात्रेएवढे आढळून आले आहे.

बायो-मिनरल खते १५० ग्रॅम झाड या दराने वापरली तरी जमिनीतील उपलब्ध पालाशच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झालेली आढळून आली आहे. असे असले तरी बायोमिनरल खतांच्या वापराने जमिनीतील उपलब्ध सल्फरच्या प्रमाणावर कोणताही परिणाम आढळून आला नाही.

बायोमिनरल खत वापराच्या शिफारशी

 फॉस्फेट आणि पोटॅशिअम उपलब्धतता वाढवणारे पी. पिनोफायलम आधारित बायोमिनरल खत १५० ग्रॅम प्रति झाड (म्हणजेच १११ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात ७४० झाडे प्रति हेक्‍टरी ) या प्रमाणे पिकाच्या विश्रांतीच्या काळात एक मात्रा आणि बागेचा ताण सोडताना किंवा पहिल्या सिंचनाच्या वेळी दुसरी मात्रा या पद्धतीने देण्याची शिफारस केली जाते.

 बायोमिनरल खताला ३:१० या गुणोत्तर प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत मिसळून १० ते १५ दिवस कुजविणे आवश्यक आहे. बायो मिनरलमधील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी त्यातील ओलावा टिकवून ठेवावा. तसेच दर ३ दिवसांच्या अंतराने त्याची फेरपालट करणे आवश्यक आहे.

बायोमिनरल मिश्रित शेणखत झाडाच्या मुळाजवळील भागामध्ये ड्रीपरखाली ५०० ग्रॅम प्रती झाड या प्रमाणे त्याचा वापर करावा. त्यानंतर त्याला जमिनीत चांगले मिसळून ते बुजवून टाकावे, हलके पाणी द्यावे. चांगला परिणाम मिळवण्यासाठी बायोमिनरल खत सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा बागेमध्ये वापरावे.

pomogranate
Pomogranate Production : राज्यात डाळिंब उत्पादन ७० टक्के घटण्याची शक्यता

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com