जमिनीची निचरा सुधारण्यासाठी सबसॉयलर, मोल नांगर

मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपासारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जाते, याला मोल निचरा पद्धत म्हणतात.
 subsoiler
subsoilerAgrowon

सबसॉयलरला हा जमिनीच्या (land to the subsoiler) पृष्ठभागाखालून २ ते २.५ फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते.
पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्‍यक आहे.
१) हलक्‍या व कमी खोलीच्या जमिनीत १.५ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. भारी, खोल जमिनीत २ ते २.५ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालतो.
२) नांगरटीपूर्वी ५ फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलरने ट्रॅक्‍टरच्या अश्‍वशक्तीनुसार २ ते २.५ फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते.
३) जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो, त्यामुळे जमिनीत हवा भरून माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. जमिनीस(Land) वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते.
४) सबसॉयलरमुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा (Water) व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता (Biological and chemical fertility)वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते.

 subsoiler
डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरने मशागत महागली

५) सबसॉयलर चालविण्यासाठी पावसाळ्यानंतर डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो. जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाइपलाइन, विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे. ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी.
६) सबसॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी.
सबसॉयलर २ ते ३ वर्षांतून एकदा वापरावा.
७) सबसॉयलरचा वापर केलेली जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी.


मोल नांगर : (Plow:)
मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपासारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जाते, याला मोल निचरा पद्धत म्हणतात. हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावेत.

 subsoiler
जमिनीच्या प्रकारानुसार वनशेतीचे नियोजन

फायदे :
१) मोल निचरा पद्धतीसाठी साधारणतः हेक्‍टरी ३ हजार ते ४ हजार रुपये इतका खर्च येतो.
२) मोल निचरा पद्धत ३ ते ५ वर्षे टिकू शकते.

निचरा पद्धतीसंदर्भात शिफारशी : ​(Drainage Recommendations:)
१) भारी काळ्या क्षारयुक्त - चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी आवश्‍यकतेनुसार जिप्सम या भूसुधारकाचा (आवश्‍यकतेनुसार ५० टक्के) तसेच हिरवळीचे पीक धैंचा यांचा एकात्मिक वापर फायदेशीर आहे.
२) कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी तसेच पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी मोल निचरा प्रणालीचा अवलंब करावा. त्यासाठी दोन मोलमधील अंतर ४ मीटर व खोली ०.६० मीटर ठेवावी.

दक्षता : (Efficiency)
१) जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असावे.
२) जमीन नैसर्गिक उताराची असावी. उतार कमीत कमी ०.२ टक्के असावा. साधारणतः १ ते १.५ टक्के उतार असलेली जमीन मोल निचरा पद्धतीसाठी उत्कृष्ट असते.
३) मोल करताना ४० ते ७५ सें.मी. खोलीवरील मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असावे. कारण नांगर ४० ते ७५ सें.मी. खोलीवर चालविला जातो. त्यामुळे या खोलीवरील माती कोरडी असेल तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात. ओलावा जास्त असेल तर नांगर ओढण्यासाठी वापरलेला ट्रॅक्‍टर (Tractor) जमिनीमध्ये रूतू शकतो. यासाठी मोल नांगर वापरण्याचे वेळी ज्या खोलीवर नांगर वापरायचा आहे, त्या खोलीवरील मातीतील ओलावा साधारणतः २० ते २५ टक्के असावा.
४) मोलमधून निचरा होणारे पाणी (Water) शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ ७५ ते ९० सें.मी. खोलीची उघडी चर असावी.दोन मोलमध्ये सर्वसाधारणपणे ४ मीटर अंतर ठेवावे.
५) मोलची खोली ४० ते ७५ सें.मी. ठेवावी.मोलची लांबी सामान्यतः २० ते १०० मीटर ठेवावी.
६) मोल निचरा करण्यासाठी साधारणतः ७५ किंवा त्यापेक्षा जास्त हॉर्सपॉवरचा ट्रॅक्‍टर वापरावा.
मोल करत असताना ट्रॅक्‍टरचा वेग सामान्यतः १ कि.मी. प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा.

कंपित सबसॉयलर : (orchard)
१) फळबागेत कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दाबली जाते,त्यामुळे मातीची रचना खराब होण्याची शक्यता वाढते. अशा जमिनीत निचरा सुधारण्यासाठी व्हायब्रेटिंग सबसॉयलर उपयुक्त ठरतो.
२) जमिनीतील कठीण थर काढून टाकल्याने मातीची रचना चांगली होते.
३) जमिनीतील पाणी (Land Water) आणि खनिजे वनस्पतीच्या मुळाच्या खोलीत उपलब्ध होतात. पावसाचे पाणी आणि सिंचनाचे (Irrigation) पाणी मुळापर्यंत जाते.पिकाचे उत्पादन आणि झाडाचे आर्थिक मूल्य वाढते.

वैशिष्ट्ये:
१) डायरेक्ट ड्राइव्ह, सोपे खोली नियंत्रण.
२) एक किंवा दोन समभाग.
३) कमी अश्वशक्ती, इंधनाचा वापर कमी केला
४) बोरॉन स्टीलची बनलेली फ्ल्यूटेड डिस्क आहे. ज्यामुळे झीज व घसारा नसतो. दीर्घ आयुष्य असते.
५) नांगरणी, हॅरो करण्याची गरज नाही.
६) मातीची रचना बदलत नाही.शेतात वखाराची गरज नाही.
७) पावसाच्या पाण्याचे संवर्धन होते.ओलावा जमिनीत टिकून राहतो.

चीझल नांगर (Chisel plow)
१) मर्यादित खोलीवर तयार जमिनीसाठी छिन्नीचा नांगर उपयुक्त आहे.
२) माती मोकळी करणे, कठीण थर तोडण्यास मदत होते.
३) हा नांगर जमिनीत १५ सें.मी पासून ४६ सें.मी खोली पर्यंत वापरता येतो.

संपर्क : वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ,कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म,जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com