Sugar Production : तीन जिल्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत निम्मेच साखर उत्पादन

यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील ७ जालना जिल्ह्यातील ४ व बीड जिल्ह्यातील ८ कारखाने ऊस गाळपात सहभागी झाले आहेत.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Aurangabad Sugar News : गतवर्षी ऊस गाळप हंगामाअखेर औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात झालेल्या साखर उत्पादनाच्या (sugar production) तुलनेत १३ फेब्रुवारीपर्यंत निम्मेच साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीय तिन्ही जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम जून पर्यंत चालला होता.

यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) ७ जालना (Jalana) जिल्ह्यातील ४ व बीड जिल्ह्यातील ८ कारखाने ऊस गाळपात सहभागी झाले आहेत. गतवर्षीच्या हंगामात अतिरिक्त उसाच्या प्रश्नामुळे तीनही जिल्ह्यातील बहुतांश कारखाने जूनपर्यंत ऊस गाळप करीत होते.

गतवर्षी जुलै अखेरपर्यंतच्या अहवालानुसार तीनही जिल्ह्यात १९ कारखान्यांनी १ कोटी ४ लाख ८० हजार ५४१ टन उसाचे गाळप करत १ कोटी १ लाख २३ हजार ८४६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते.

हे उत्पादन करताना औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.४३ टक्के राहिला होता. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.६९ टक्के राहिला होता.

Sugar Production
Sugar Production : मराठवाड्यात दीड कोटी क्विंटलवर साखर उत्पादन

गतवर्षी जालन्यातील एका कारखान्याचा हंगाम एप्रिलमध्ये तर इतर कारखान्यांचा हंगाम मे, जून मध्ये उरकला होता. औरंगाबाद व बीडमधील कारखाने मात्र मे, जून मध्येच बंद झाले होते.

यंदा १३ फेब्रुवारी अखेरपर्यंत तीनही जिल्ह्यातील १९ कारखान्यांनी ६२ लाख ६४४ टन उसाचे गाळप करत ५५ लाख ४१ हजार ७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

ही साखर उत्पादन करताना औरंगाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.३५ टक्के, जालन्यामधील कारखान्यांचा १०.०२ टक्के तर बीड मधील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.५९ टक्के इतका असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा गतवर्षीप्रमाणे काही कारखान्यांच्या परिसरात पुन्हा एकदा शिल्लक उसाचा प्रश्न डोके वर काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यापुढील गाळप हंगामाच्या काळात गतिमान ऊस गाळप करून कारखान्यांना ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा लागणार आहे.

ऊसगाळपात सहभागी कारखाने...

गतवर्षीच्या ऊस गाळप हंगामात औरंगाबाद जिल्ह्यातीतील ७ कारखाने, जालन्यात ५ व बीड जिल्ह्यातील ७ असे मिळून १९ कारखान्यांनी सहभाग नोंदविला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com