पाथरी येथे क्रांतिदिनी शेतकरी संघटनेतर्फे ऊस परिषद

पाथरी येथील साई निवास सभागृहामध्ये ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पाथरी येथे क्रांतिदिनी शेतकरी संघटनेतर्फे ऊस परिषद
SugarcaneAgrowon

परभणीः दोन साखर आणि इथेनॉलनिर्मिती कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी पाथरी (जि. परभणी) येथे ऊस परिषद (Sugarcane Conference) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे यांनी दिली.

पाथरी येथील साई निवास सभागृहामध्ये ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजित या ऊस परिषदेस शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil), कार्याध्यक्ष कालिदास आपेट, अॅड. अजित काळे, शिवाजीराव नांदखिले, रामेश्वर गाडे, विमलताई आकनगिरे, बाळासाहेब पटारे, पांडुरंग रायते, माणिक शिंदे, धनंजय काकडे पाटील, सादिक कुरेशी, हाजी शब्बीर आदी उपस्थित राहणार आहेत.

दोन साखर आणि इथेनॉल कारखान्यांमध्ये हवाई अंतराची घातल्याने महाराष्ट्रातील साखर सम्राटांच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभाराला संरक्षण मिळाले आहे. गुजरात, उत्तर प्रदेश मध्ये उसाला प्रतिटन ३५०० रुपयेहून अधिक भाव मिळत असताना येथील साखर कारखान्यात काटामारी, वजनचोरी, रिकव्हरीचोरी, ऊसतोडणी मजुरांची प्रचंड मनमानी वाढली आहे.

साखर सम्राटांनी शेतकऱ्यांची अघोरी पद्धतीने लुटालूट केली, असे मुद्दे घेउन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या नियोजनासाठी परभणी येथील बैठकीस कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मराठवाडा प्रमुख बंडू सोळंके, जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे, युवा आघाडीचे भागवत जावळे पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे सय्यद जामकर, भारत फुके, नारायण अवचार, महादेव अवचार, त्रिंबक सुरवसे, तात्यासाहेब सुरवसे, माउली निर्वळ, भास्कर निर्वळ, मोहन कुलकर्णी, अशोकराव कुलकर्णी, कृष्णा भोसले, शिवाजीराव बोबडे, रमेश माने, किशोर जोशी आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com