बारामतीच्या पश्चिम भागात उसाचे पिक अडचणीत

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील जिरायत भागात पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे उसाचे पिक जळून चालले आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

मोरगाव, ता. 20 ः बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील जिरायत भागात पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे (Water Shortage) उसाचे पिक जळून चालले आहे. पाण्याअभावी गतवर्षी लागवड केलेले उसाचे पिक अडचणीत आले असून उसउत्पादक शेतकऱ्यांचा (Sugarcane Farmer) उसलागवडीचा खर्च वाया जाणार आहे.

वास्तविक, पुरंदर योजनेपुर्वी या पट्ट्यासाठी पावसाच्या पाण्याशिवाय दुसरा कोणताच स्त्रोत पाण्यासाठी उपलब्ध नव्हता. मात्र, पुरंदर योजनेचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होत असले तरी या पाण्याचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही. महागड्या पाण्यामुळे उत्पादनखर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरंदर योजनेचे पाणी सातत्याने घेण्यास शेतकरी धजावत नाहीत. जुलै 2021 मध्ये लागवड केलेल्या उसाची परिस्थिती सध्या तरडोली, आंबी बु्द्रुक, आंबी खुर्द, मोरगाव या भागात बिकट आहे. विहिरीची पाण्याची पातळी कमी झालेल्या परिसरात चारा पिकांसह, उसाचे पिक अडचणीत आले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी खरिप हंगामपुर्व होणााऱ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. वाढते तापमान, विहिरीत पाण्याने गाठलेला तळ यामुळे सध्या शेतातील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पुरंदर योजनेचे पाणी

टंचाईग्रस्त गावांचा निकष लावून सरकारने कमी दरात उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वास्तविक, बारामतीच्या जिरायत भागात गेली पाच वर्षात मोठ्या प्रमाणाात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे मोठ्या वेगाने सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यश्रेत्रातील मोरगाव गटात उस लागवडीचे क्षेत्र वाढले. मात्र, गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यावर्षी उसाचे पिक अडचणीत आले आहे. पुरंदर योजनेच्या व्यवस्थापनाने टंचाईग्रस्त गावात पाण्याचे दर कमी ठेवावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com