Summer Crop Sowing : पाच जिल्ह्यांत २९ हजार एकरांवर उन्हाळी पीक

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर आहे.
Sowing
SowingAgrowon

Latur News : येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालया अंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यात उन्हाळी पिकांची २९ हजार ५२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये भुईमूगला (groundnut) शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर आहे. या क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात २९ हजार ५२५ हेक्टरवर अर्थात ४१ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूगला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्या पाठोपाठ सोयाबीन व उन्हाळी मका पेरणीला शेतकऱ्यांची पसंती आहे.

Sowing
Summer Sowing : मराठवाड्यात ३३ हजार हेक्टरवर उन्हाळी पीके

पाचही जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १६,१५६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ९६३४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेले सोयाबीनचे पीक सध्या उगवणी व वाढीच्या अवस्थेत आहे.

उन्हाळी भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर असताना प्रत्यक्षात १० हजार ३६४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली आहे.

भुईमुगाचे पीक सध्या उगवणी व वाढीच्या अवस्थेत आहे. उन्हाळी मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८०५७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३ हजार २७ हेक्‍टरवर उन्हाळी मकाची पेरणी झाली आहे.

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३८ टक्के क्षेत्रावर असलेले उन्हाळी मका पीक सध्या उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे. खरिपाच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Sowing
Summer Season : झळा उन्हाच्या, चिंता पावसाची

आता रब्बीच्या पिकावर अवकाळीचे संकट घोंगावत असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे उन्हाळी पिकाच्या पेरणीला पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा आता या पिकावर अवलंबून आहेत.

जिल्हानिहाय सरासरी क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा - सरासरी क्षेत्र - प्रत्यक्ष पेरणी - टक्केवारी

लातूर- २३९६ १३७४ ५७

धाराशिव- ९५५५ २८९२ ३०

नांदेड २२४४१ ९२६४ ४१

परभणी - १०९५९ ६५१२ ५९

हिंगोली - २६३४९ ९४८३ ३६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com