Summer Crop Sowing In Latur : लातूर विभागात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पीक पेरणी

लातूर विभागातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर असून, १६ लाख ७१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १२३ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली होती.
 Sowing
SowingAgrowon

Latur News : लातूर विभागातील पाचही जिल्ह्यांत उन्हाळी हंगामाचे (Summer Season) सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर असून ३० हजार ३९७ हेक्टर म्हणजे ४२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हाळी पीकवाढीच्या अवस्थेत आहेत, तर दुसरीकडे रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे.

लातूर विभागातील रब्बी हंगामातील (Rabi Season) सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर असून, १६ लाख ७१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १२३ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली होती. मका वगळता इतर रब्बी पिकांची काढणी (Crop Harvesting) अंतिम टप्प्यात आहे.

उन्हाळी पीकनिहाय स्थिती

उन्हाळी सोयाबीन : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार १५६ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ९ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ६० टक्के आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.

उन्हाळी भुईमूग : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर असून, प्रत्यक्षात १० हजार ९७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ४२ टक्के आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.

 Sowing
Mango Crop Damage : उन्हाचा चटका हापूसला फटका

उन्हाळी मका : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ हजार ०५७ हेक्टर असून, आतापर्यंत ३१३७ हे.क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ३९ टक्के आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.

रब्बी हंगामातील पीकस्थिती

रब्बी ज्वारी : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर होते. प्रत्यक्षात २ लाख ९७ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ८० टक्के आहे. पीक सध्या काढणी अवस्थेत असून, ७५ ते ८० टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

गहू : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर होते. प्रत्यक्षात १ लाख ५४ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सध्या काढणी अवस्थेत असून, ८५ ते ९० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

हरभरा : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असून, प्रत्यक्षात ११ लाख ५९ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी १४८ टक्के आहे. पीक सध्या काढणी अवस्थेत असून, ९५ टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

रब्बी मका : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ९७१ हेक्टर होते. प्रत्यक्षात १७ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती . त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सध्या कणसे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे.

करडई : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात २३ हजार ९४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १२३ टक्के आहे. पीक सध्या काढणी अवस्थेत असून, ९५ टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com