Summer Crop Cultivation: पळसखेड येथे उन्हाळी मूग शेतीदिन व शिवारफेरी

Summer Season Farming : शेती आणि आहारात मूग पिकास (mung bean crop) अनन्यसाधारण महत्त्व आहे. कडधान्य पिकांमध्ये अल्पावधीत तयार होणारे, खरीप व उन्हाळी हंगामातील हे महत्त्वाचे पीक आहे.
Summer Season
Summer SeasonAgrowon

Washim News : शेती आणि आहारात मूग पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कडधान्य पिकांमध्ये अल्पावधीत तयार होणारे, खरीप व उन्हाळी हंगामातील हे महत्त्वाचे पीक आहे. वाशीम कृषी विज्ञान केंद्राच्या (Agriculture Science Center) वतीने रिसोड तालुक्यातील मौजे पळसखेड येथे उन्हाळी मूग शेतीदिन व शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य संतोष अंबादास खरात होते. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे, विस्तारतज्ज्ञ डॉ. एस. के. देशमुख व किटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Summer Season
Poultry Summer Management : उन्हाळ्यात कोंबड्यांतील मरतूक कशी टाळाता येईल?

प्रास्ताविकात डॉ. देशमुख यांनी माती परीक्षणाच्या विविध पद्धती, शेतीतील खर्च कमी करावयाच्या उपाययोजना, हवामान संदेशासाठी नाव नोंदणी करावी तसेच घरगुती पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा उत्पादनावर भर द्यावा व फळबाग लागवड वाढवावी असे आवाहन केले.

डॉ. काळे यांनी पिकांची फेरपालट, सरी वरंबा पद्धतीचे फायदे, उत्पन्न दुप्पट करून उत्पादकता वाढवावी, उगवणशक्ती तपासणी, बीज प्रक्रिया, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क वापर वाढविणे तसेच नैसर्गिक शेती व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा असे सूचविले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com