Summer Sowing : मराठवाड्यात ३३ हजार हेक्टरवर उन्हाळी पीके

मराठवाड्यातील लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर इतके आहे.
Summer Crop
Summer CropAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील यंदाच्या उन्हाळी हंगामात ९ मार्चअखेर ३३ हजार ३०१ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी (Summer Crop Sowing) झाली आहे. आठही जिल्ह्यातील उन्हाळी पेरणीचे (Summer Sowing Acreage) सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४ हजार ३५९ हेक्टर इतके, असल्याची माहिती कृषी विभागाकडून (Agriculture Department) देण्यात आली.

मराठवाड्यातील लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात ९ मार्चअखेर २१ हजार ८९६ हेक्‍टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.

जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३१ टक्के इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यात उन्हाळी पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र ३२ हजार ६५९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ११ हजार ४०५ हेक्टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३४.९२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पेरणी झाली आहे.

Summer Crop
Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय

पीकनिहाय पेरणी व स्थिती...

भुईमूग : लातूर कृषी विभागात भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर असून प्रत्यक्षात २८ टक्के म्हणजे ७ हजार ३८७ हेक्टरवरच भुईमुगाची पेरणी झाली आहे. हे पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

दुसरीकडे औरंगाबाद कृषी विभागात भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ९६६ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ हजार २७८ हेक्टर वर भुईमुगाची पेरणी झाली आहे. या विभागात पीक वाढीच्या ते आरा लागण्याच्या अवस्थेत आहे

Summer Crop
Summer Heat : यंदाचा फेब्रुवारी १२३ वर्षातील सर्वाधिक उष्ण

उन्हाळी सोयाबीन: लातूर कृषी विभागात उन्हाळी सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार १५६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हाळी सोयाबीनचे पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

औरंगाबाद कृषी विभागात अजून उन्हाळी सोयाबीनची पेरणीच झाली नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

उन्हाळी मका: लातूर कृषी विभागात उन्हाळी मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ हजार ०५७ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ हजार ४२१ हेक्टर क्षेत्रावर मकाची पेरणी झाली आहे.

दुसरीकडे औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यात उन्हाळी मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ३७३ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ हजार २४५ हेक्टरवर मकाची पेरणी झाली आहे. दोन्ही विभागातील मका पीक उगवणी ते वाढीच्या अवस्थेत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com