पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ

राज्य शासनाने महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत यापूर्वी परिपत्रक काढून जलसंपदा विभागात पाणी वापर संस्था कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Water
Water Agrowon

नाशिक : राज्य शासनाने महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत (Watershed Project) यापूर्वी परिपत्रक काढून जलसंपदा विभागात (Department Of Water Resources) पाणी वापर संस्था कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे राज्यात अनेक कार्यालयांत असे कक्ष स्थापन करण्यात आले होते. परंतु त्यानंतर जलसंपदा विभागातून मोठ्या प्रमाणावर अभियंते सेवानिवृत्त झाल्याने या कक्षाचे काम ठप्प झाले होते. आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे (Dr. Sanjay Belsare) यांच्या संकल्पनेतून पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील पहिला मार्गदर्शन व सक्षमीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी वापर संस्थाच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ मिळणार आहे.

Water
Water Management : पाऊस पाण्याचे योग्य नियोजन

नाशिक येथे पालखेड पाटबंधारे विभागात हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्यात अनेक पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत. त्यांची व्याप्ती वाढत असली तरी त्या संस्था सक्षम होत नसल्याची स्थिती आहे. कामकाजात अडचणी असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. यासाठी पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्या प्रयत्नातून पाणी वापर संस्था मार्गदर्शन व सक्षमीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

‘महाराष्ट्र पाणी वापर संस्था मिशन’अंतर्गत या कक्षाचे उद्‍घाटन मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे यांच्या हस्ते झाले. या वेळी नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपकार्यकारी अभियंता श्री. बधान, समाज परिवर्तन केंद्राचे विश्‍वस्त लक्ष्मीकांत वाघावकर, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष अरुण घुमरे, सचिव बाळासाहेब कदम आदींसह जलसंपदा विभागातील तांत्रिक शाखेच्या कर्मचाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती.

Water
Water Storage:पुणे जिल्ह्यातील अकरा धरणे भरली

...असे असणार कामकाज

- पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित कक्ष.

- पालखेड पाटबंधारे कार्यालयात प्रशिक्षण कक्ष स्थापन.

- जलसंपदा विभाग तसेच पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींना होणार मार्गदर्शन.

- पाणी वापर संस्था संबंधित दैनंदिन कामकाजातील अडचणी, शासननिर्णय, पाण्याचे मोजमाप, वितरण, वसुली अशा विविध विषयांवर मंगळवार ते शुक्रवार दरम्यान दु. १ ते सायं ६ पर्यंत होणार मार्गदर्शनपर कामकाज.

- सेवानिवृत्त शाखा अभियंता लक्ष्मीकांत वाघावकर स्वयंस्फूर्तीने विनामानधन तत्त्वावर कक्षात मार्गदर्शन करण्यासाठी असणार उपलब्ध.

- कक्षात शासनाने पाणी वापर संस्थांविषयी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचे केले जाणार संकलन.

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन स्पर्धा विषयी मार्गदर्शन.

पाणी वापर संस्था तसेच महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ व नियम २००६ संबंधी अभ्यास व कामकाजाच्या अनुभवातून यापूर्वी वाल्मी, मेटा, यशदा तसेच सिंचन व्यवस्थापनेत सेवा करणारे शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची यापूर्वी संधी मिळाली. आता पाणी वापर संस्थांची चळवळ यापुढेही बलशाली व्हावी. यासाठी कक्षाच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने योगदान देणार आहे.

- लक्ष्मीकांत वाघावकर, सेवानिवृत्त शाखा अभियंता व विश्‍वस्त-समाज परिवर्तन केंद्र.

पाणी वापर संस्थांना अनेक शासन निर्णय माहीत असतात; मात्र दैनंदिन कामकाजात तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे कामकाज कार्यक्षम होत नाही. आता अशा संस्थांना या कक्षाच्या माध्यमातून मार्गदर्शन करून सक्षम करण्याचे काम केले जाणार आहे.

- डॉ. संजय बेलसरे, मुख्य अभियंता-उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभाग.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com