शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘आरसीएफ’ची साथ

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी मंत्रालय, कृषी विद्यापीठ, खत कंपन्या इत्यादींना पुढे येण्याचा सल्ला दिला आहे.
RCF
RCFAgrowon

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न दुप्पट (Doubling Agriculture Income) करण्यासाठी कृषी मंत्रालय, कृषी विद्यापीठ, खत कंपन्या (Fertilizer Company) इत्यादींना पुढे येण्याचा सल्ला दिला आहे. डबलिंग फार्मर्स इन्कम (डीएफआय) समितीने शेतीला मूल्याधारित उपक्रम म्हणून मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नवाढीचा आधार म्हणून ‘सुधारित बाजारपेठेचा दुवा’ आणि ‘स्वावलंबी मॉडेल’ सक्षम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्न (Farmer Income)वाढविण्याकरिता माती परीक्षण, पेरणीपूर्व बीज प्रक्रिया, सुधारित बियाणे जाती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि इतर तांत्रिक विषयांच्याबाबत प्रशिक्षित करण्यात येत आहे.

RCF
Fertilizer : लिंकिंगला विरोध करताच तपासणी मोहीम

पीक उत्पादनाच्या बरोबरीने प्रतवारी, पॅकेजिंग, हस्तांतर आणि वाहतूक यामध्ये सुधारणा करून शेतीच्या उत्पादनांचा थेट बाजारपेठेशी संबंध जोडणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी उत्पादक संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या अशा शेतकरी गटांची निर्मिती आवश्यक आहे. जेणेकरून खर्च कमी होण्यास तसेच शेतीमालास जास्त दर मिळण्यास मदत होईल. या दीर्घकालीन पद्धतीमुळे ग्रामीण भागातील शेती नसलेल्या तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होत आहेत. याच दृष्टिकोनातून ‘आरसीएफ’ने पुढाकार घेऊन पुणे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संस्थांशी संपर्क साधला. यातून शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मार्ग दाखवण्याचे नियोजन केले आहे. आधुनिक शेतीमध्ये आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.

RCF
Fertilizer : ‘एक खत’ समस्या अनेक

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने आरसीएफ, पुणे कार्यालयाने पुढाकार घेऊन भामा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, पिंपरी (बु.), ता. खेड, जि. पुणे यांची निवड केली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने भामा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी २०१५ मध्ये अस्तित्वात आली. यामध्ये २५ शेतकरी गट आणि ४८८ सदस्य असून, त्यातील ३०० सदस्य पिंपरी (बु.) या गावातील आहेत. या कंपनीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.च्या वरिष्ठ व्यवस्थापनाद्वारे पुणे कार्यालयामार्फत हाती घेतलेल्या ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे’ या योजनेचा आढावा घेण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, संचालक विपणन, कार्यकारी संचालक विपणन, महाप्रबंधक (महाराष्ट्र ), उप-महाप्रबंधक यांनी पिंपरी (बु.) गावाला भेट दिली. संपूर्ण योजनेविषयी जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती. तसेच प्रात्यक्षिक क्षेत्राला भेट दिली. ‘आरसीएफ’च्या योजनेबद्दल लाभार्थी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या काळात याच पद्धतीने पिकांची निवड, कृषी निविष्ठांचे नियोजन आणि बाजाराची निवड करण्याबाबत शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.

‘आरसीएफ’चे मार्गदर्शन ः

१. माती परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन.

२. शिफारशीत प्रमाणात कृषी निविष्ठांचा वापर.अनावश्यक खर्च टाळून शेतीच्या उत्पादन खर्चात कपात.

३. कृषी निविष्ठांची योग्य किमतीवर उपलब्धता.

४. बाजाराची मागणी आणि कापणीचा काळाचे नियोजन करून लागवडीचे वेळापत्रक.

५. शेतीमालाची प्रतवारी आणि पॅकिंग.

६. योग्य बाजारपेठेची निवड.

----------------------------------------------------------------

- मधुकर पाचारणे, ७५८८०४०६२९

(सहायक महाव्यवस्थापक (विपणन), आरसीएफ, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com