Agri Tourism : कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना आधार

Agri Business : पारंपरिक शेती व्यवसाय परवडत नाही, अशी ओरड होत असताना कृषी पर्यटनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तारले आहे.
Agritourism Business
Agritourism BusinessAgrowon

Thane News : पारंपरिक शेती व्यवसाय परवडत नाही, अशी ओरड होत असताना कृषी पर्यटनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तारले आहे. जिल्ह्यात कृषी पर्यटन क्षेत्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच कोरोनानंतर अनेकांनी शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या कृषी पर्यटनात स्वतःला झोकून दिले.

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे ही शहापूर आणि मुरबाड भागात मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच भिवंडी, कल्याणमधील ग्रामीण भागातही अनेक शेतकरी कृषी पर्यटनाकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यात धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन क्षेत्रे मोठ्या संख्येने आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने गडकिल्ले आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पण ही संख्या उन्हाळ्यात कमी असते, ती भरून काढण्याची जबाबदारी कृषी पर्यटन क्षेत्र समर्थपणे सांभाळत आहे.

Agritourism Business
World Agri Tourism Day : महाराष्ट्रात अशी रोवली कृषी पर्यटनाची मुहूर्तमेढ

शहरातील राहणाऱ्यांना कृषी पर्यटनाबद्दल जास्त आकर्षण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. जिल्ह्यात विविध पिके घेणारे शेतकरी असल्‍याने कृषी पर्यटनातही वैविध्य दिसून येते. इतर उद्योगांच्या तुलनेत कृषी पर्यटन व्यवसाय पर्यावरणपूरक, शेतीशी निगडित आहे.

पायाभूत सुविधांचा वापर करून हा व्यवसाय फायदेशीर करता येतो, असे कृषी पर्यटन केंद्र व्यवसायिकांनी सांगितले.

ग्रामीण भागाचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी कृषी पर्यटन धोरण राबवणारे महाराष्‍ट्र हे देशातील पहिले राज्‍य आहे. कृषी पर्यटनातून दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन आदी विविध पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येते. शहरीतील लोकांना ग्रामीण भागातील आणि शेतीमधील विविधतेची त्यांना माहिती व्हावी यादृष्टीने कृषी पर्यटन धोरणाचा मोठा लाभ होणार आहे.
अदिती तटकरे, माजी पर्यटन राज्‍यमंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com