‘अन्न, नागरी’च्या ४० कोटींच्या गोदाम बांधकामांना स्थगिती

अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे (Food And Civil Supply) नांदेडमधील कुंडलवाडी, नायगाव आणि नांदेड येथे तीन गोदामे बांधण्यात येणार होती.
Government Warehouse
Government WarehouseAgrowon

मुंबई : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे राज्यात ठिकठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नवीन गोदामांच्या बांधकामांना शिंदे (Eknasth Shinde) सरकारने स्थगिती दिली आहे. यातील बहुतांश गोदामे कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या नांदेडमधील आहेत. ४० कोटींच्या कामांपैकी नांदेडमधील २६ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

मागील महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknasth Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समित्यांतर्फे वितरित करण्यात येणारा निधी, सामाजिक न्याय, पर्यटन आणि मृदा व जलसंधारणाच्या निधीचा समावेश आहे. जवळपास सहा हजार कोटींवर अधिक रकमेची कामे स्थगित करण्यात आली आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे (Food And Civil Supply) नांदेडमधील कुंडलवाडी, नायगाव आणि नांदेड येथे तीन गोदामे बांधण्यात येणार होती. त्यासाठी १४ कोटी, ४० लाख ४३ हजार ८७५ इतका निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच पिंपळगाव आणि मुखेड येथील गोदामांसाठी ११ कोटी ७४ लाख, ६६ हजार १८४ इतका निधी मंजूर करण्यात आला होता.

या व्यतिरिक्त जालना येथील घनसांगवीतील गोदामासाठी २ कोटी ३६ लाख एक हजार ३३३, सांगलीतील तडसर येथील गोदामासाठी ७ कोटी ६० लाख ६९ हजार १४३, सोलापुरातील चिकमहूद येथील गोदामासाठी ४ कोटी ८७ लाख ५२ हजार ७५९ इतका निधी मंजूर करण्यात आला होता.

पवार, मुंडे, ठाकरे, गडाख यांना धक्का

स्थगितीचा सपाटा लावला असतानाच ‘नाबार्ड’च्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्य साठवणुकीसाठी बांधण्यात येणाऱ्या नवीन गोदामांच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) , धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आदित्य ठाकरे (Aaditya Thackray) आणि शंकरराव गडाख यांना हा धक्का मानला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com