Irrigation Scheme : ‘बोरी-अंबेदरी’मुळे लाभक्षेत्रात शाश्वत सिंचन सुविधा

मालेगाव तालुक्यातील बोरी-अंबेदरी मुख्य कालव्याचे बंदिस्त नलिकेद्वारे पाणी आवर्तनाच्या पहिल्या टप्प्याचे जलपूजन मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
Irrigation
IrrigationAgrowon

Bori Ambederi Irrigation Scheme : बोरी-अंबेदरी या लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बंदिस्त कालव्याद्वारे पाणीपुरवठा योजनेमुळे (Canal Water Supply) पाणी बचत होऊन माळमाथ्यावरील गावांना फायदा होणार आहे.

त्याअनुषंगाने शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन लाभ क्षेत्रातील गावांच्या शेतीस शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.

मालेगाव तालुक्यातील बोरी-अंबेदरी मुख्य कालव्याचे बंदिस्त नलिकेद्वारे पाणी आवर्तनाच्या पहिल्या टप्प्याचे जलपूजन मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार, उपअभियंता महेंद्र नेटावटे, कनिष्ठ अभियंता सुनील गांगुर्डे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह तालुका पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अधिकारी, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Irrigation
Solapur Ujani Canal : कालवा फुटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

भुसे म्हणाले, की तालुक्यातील टिंगरी गावाजवळ १९९२ मध्ये बोरी नदीवर बोरी-अंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम करण्यात आले. मागील काळात बोरी-अंबेदरी परिसरात सरासरी ५० टक्के क्षेत्रास सिंचनाचा लाभ होऊ शकला.

Irrigation
Bori Anderi Project : ‘बोरी-आंबेदरी’विरोधात महिलांचा जलसमाधीचा प्रयत्न

परंतु या बंदिस्त पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून १०० टक्के क्षेत्रास सिंचनाचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच या बंदिस्त पाणीपुरवठा योजनेचे अठरा किलोमीटरपैकी पावणेतीन किलोमीटरचे काम आतापर्यंत झाले आहे.

या माळमाथ्याच्या विकासामध्ये हा प्रकल्प क्रांतिकारक असून त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चित उंचावणार आहे.

शेततळ्यांना बंदिस्त पाइपलाइनमुळे पाण्याची सुविधा

बंदिस्त पाइपलाइन प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी बचत होऊन पुढील आवर्तन सोडण्यास मदत होणार असून त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकऱ्यांच्या शेततळ्यांनादेखील या बंदिस्त पाइपलाइनमुळे पाण्याची सुविधा मिळणार असल्याचेही भुसे यांनी या वेळी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com