Protest : गंगाखेड तहसी‌ल कार्यालयात 'स्वाभिमानी'चं बोंब मारो आंदोलन

वारंवार मागणीचे निवेदने , पत्रे तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करत गावकरी थकले होते.
Protest
ProtestAgrowon

Parbhani News : जिल्ह्यातील मसला (ता.गंगाखेड) येथील पांदण रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणीसाठी सोमवारी (ता.६) होळीच्या दिवशी तहसील कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे (Swabhimani Shetkari Sanghtana) बोंब मारो आंदोलन (Bomb maro Andolan) करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसापासून याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. वारंवार मागणीचे निवेदने , पत्रे तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करत गावकरी थकले होते.

मात्र प्रशासन गावकऱ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आले आहे. गाव शिवरातून गेलेला मसला ते अंगलगाव हा रस्ता काळाच्या ओघात जवळपास पूर्ण बुजलेल्या अवस्थेत आहे, त्यामुळे जवळपास ४०० शेतकरी आपल्या शेती कामासाठी प्रचंड गैरसोयीचा सामना करत असतात.

Protest
Onion Rate : कांद्याच्या माळा घालून उद्यापासून आंदोलन

निवेदने अनेकवेळा देऊनही प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे पाहून मसला गावकऱ्यांनी आठ दिवसापूर्वी तहसील कार्यालयास निवेदन देऊन सोमवारी (ता.६) होळीच्या दिवशी " बोंब मारो" आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार आज बहुसंख्य गावकरी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तहसील कार्यालयात जमून घोषणा देत " बोंब " मारो आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर तहसीलदारांनी आंदोलक शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दालनात बोलाऊन सर्व प्रकरणाची चर्चा केली. लगोलग मसला गावाकडे रवाना झाले.

Protest
Agriculture Electricity : वीजबिलमुक्तीसाठी शिरूरच्या शेतकऱ्यांचे आंदोलन

यावेळी गावकरी शेतकरी यांच्यासह जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, भास्कर खटिंग, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, अंकुश शिंदे, उध्दव जवांजाल, दिगंबर पवार, सुभाष पवार, गणपतराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, आप्पासाहेब कदम, शिवाजी शिंदे, नागेश शिंदे, अंबादास शिंदे, मारोतराव शिंदे, विठ्टलराव चेअरमन, प्रकाश शिंदे शेतकरी हजर होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com