Raisin Subsidy : द्राक्ष, बेदाण्याच्या अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चा सांगलीत मोर्चा

Swabhimani Shetkari Sanghtana : द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच पाहिजे, सरकारच्या चुकीच्या धोरणांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
Raisin Subsidy
Raisin SubsidyAgrowon

Sangli March News : द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच पाहिजे, सरकारच्या चुकीच्या धोरणांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. अनुदान जाहीर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.

Raisin Subsidy
Bedana Market : गोड बेदाणा होतोय कडू

सांगली येथील विश्रामबाग येथून बुधवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता मोर्चास प्रारंभ झाला. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक संकटात सापडला आहे. द्राक्षाला दर मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. परंतु यंदा उत्पादन वाढले.

परिणामी, दर कमी झाले. त्यामुळे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक देताच संतप्त आंदोलनकर्त्यांसोबत पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागण्या अशा...

- कांदा उत्पादकांप्रमाणे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांना अनुदान द्यावे

- द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख, तर बेदाणा उत्पादकांना प्रति टन एक लाख रुपये असे अनुदान जाहीर करावे

- फसवणूक करणाऱ्या दलालांना परवाना सक्तीचा करावा

- बेदाणा सौद्यात बेदाण्याची उधळण बंद करावी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com