स्वातंत्र्याचा मधुर स्वर

आयुष्य नेहमी अर्धगामी दिशेने जायला हवं, असं असलं तरी अधोगतीही सुंदर असतेच, पण ती केवळ झाडाच्या मुळांचीच. तसेच बंधन किंवा पारतंत्र्य जर कुणाचं सुंदर असेल तर ते फक्त कमळदलातील भुंग्याचंच!
Freedom
FreedomAgrowon

जयश्री वाघ

आयुष्य नेहमी अर्धगामी दिशेने जायला हवं, असं असलं तरी अधोगतीही सुंदर असतेच, पण ती केवळ झाडाच्या मुळांचीच. तसेच बंधन किंवा पारतंत्र्य जर कुणाचं सुंदर असेल तर ते फक्त कमळदलातील भुंग्याचंच! माणसाला स्वातंत्र्य प्रिय असते. कुणालाही पर नियंत्रणात राहायला आवडत नाही. कुणाच्या दावणीला बांधून घेणारे दास्यत्व अगदी प्राण्यांनाही आवडत नाही. एरिक फ्रॉम यांचं फियर ऑफ फ्रीडम नावाचं एक पुस्तक आहे, ते म्हणतात, स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागते. निर्णय घ्यावे लागतात. ते तडीस नेऊन त्याच्या बऱ्यावाईट परिणामांची जबाबदारी घ्यावी लागते. ओशो म्हणतात, ‘‘स्वातंत्र्य ही दुधारी गोष्ट आहे. स्वातंत्र्य जसं योग्य गोष्टी निवडण्याचं असतं, त्याच वेळी ते गर्तेत जाण्याचं देखील असतं. जसं दोरीविना पतंग स्वतंत्र तर होईल पण त्याला उंच जाण्याऐवजी कोसळण्याचीच शक्यता अधिक. म्हणूनच स्वातंत्र्य सांभाळण्यासाठी विवेक पाहिजे.

Freedom
Kharif Sowing : देशात पेरणीने घेतला वेग

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान पंडित नेहरू गाडीतून जात होते. एक बाई रस्त्याच्या मधोमध चालत होती. हॉर्न वाजवूनही ती काही बाजूला जाईना. विचारणा केली, तर ती बाई म्हणाली, ‘‘आता देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, आम्ही रस्त्याने हवे तसे चालू.’’ हे ऐकून नेहरूंनी कपाळाला हात लावला असणार!

Freedom
Kharif Sowing : पुणे विभागात पेरणीच्या क्षेत्रात वाढ

‘याचसाठी केला होता (का) अट्टहास?’ असं त्यांना वाटलं असणार नक्की.

एका हत्तीचा मालक त्याच्या गळ्यात एक छोटीशी साखळी बांधत असतो, लहान पिलू असताना जी साखळी त्याच्या गळ्यात होती तीच तो मोठा झाल्यावरही बदलली नाही. जी तो सहज तोडू शकत होता. पण ही साखळी तुटू शकत नाही हा लहानपणीचा अनुभव त्याच्या मनावर कोरला गेल्याने तो तसा प्रयत्नसुद्धा करत नाही. त्याचप्रमाणे एका उंटाच्या गोष्टीत त्याला बांधण्याची आणि सोडण्याची नुसतीच ॲक्शन करावी लागते. सकाळी दोरी सोडण्याची खोटी खोटी कृती मालकाने केल्याशिवाय तो जागेवरून हलत नसे. कारण त्याला गुलामीची सवय झालेली आहे.

गुलामीची सवय विचारशक्ती नष्ट करते. आपण परतंत्र आहोत हेही माणसाच्या लक्षातही येत नाही. मग स्वातंत्र्याची चव आणि चाडही उरत नाही. जशी पिंजऱ्यात राहणाऱ्या पोपटाची उडण्याची शक्तीच कमी होऊन जाते.

कुसुमाग्रज आपल्या एका कवितेत फार सुंदर सांगतात, की...

सर्वांत मधुर स्वर

ना मैफलीतील गाण्याचा,

ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा,

ना सागराचा, ना कूजनाचा,

ना आमंत्रक ओठांतील हसण्याचा.

सर्वांत मधुर स्वर

कोठे तरी, कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला

खळाखळा तुटण्याचा!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com