Swine Flu : नव्या वर्षातही जिल्ह्यात स्वाइन फ्लूची धास्ती

स्वाइन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक नुकतीच महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याच्या कक्षात पार पडली.
Swine Flu
Swine FluAgrowon

नागपूर ः नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात सहा जणांना स्वाइन फ्लूची (Swine Flu) लागण झाली असून यातील एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली.

त्यामुळे नव्या वर्षातही स्वाइन फ्लूची धास्ती कायम दिसून येत आहे. मागील वर्षी पावणेचारशे नागरिकांना स्वाइन फ्लू होऊन यातील २१ जणांचा मृत्यू (Swine Flu Death) झाला होता.

स्वाइन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक नुकतीच महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याच्या कक्षात पार पडली.

शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल संशयित स्वाइन फ्लू रुग्ण व त्यातील बाधितांचा आढावा घेण्यात आला.

समितीसमोर एका स्वाइन फ्लू संशयित रुग्णाच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्वाइन फ्लूने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाचे वय ७२ असून त्यांना अनेक सहव्याधी असल्याचे निष्पन्न झाले.

शहरात १ जानेवारीपासून आतापर्यंत ६ स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील एकाचा मृत्यू झाला.

२०२२ मध्ये महानगरपालिका हद्दीतील ३७१ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. यापैकी २१ रुग्णांचा मृत्यू झाला तर ३५० रुग्ण औषधोपचाराने बरे झाले.

सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फ्लू सदृश लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Swine Flu
‘ई -नाम’अंतर्गत पाच राज्यांमध्ये आंतरराज्य व्यापार सुरू करणार : पी. के. स्वाईन

वेळीच औषधोपचार आणि योग्य काळजी घेतल्यास स्वाइन फ्लूवर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असा सल्लाही महापालिकेने दिला आहे.

बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सदस्य मेयोचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रवीण सलामे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र खडसे, बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डागा रुग्णालयाच्या स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. माधुरी थोरात, मनपाचे स्वाइन फ्लू कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com