Minister Atul Save : कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई करणाऱ्या कारवाई करा

Fertilizer, Seed Shortage : जालना जिल्ह्यात बी-बियाणे, खते व कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण आणि लिंकिंग करणाऱ्या दुकानदारांवर भरारी पथकांनी अचानक भेटी देऊन कायदेशीर कारवाई करावी.
Minister Atul Save
Minister Atul SaveAgrowon

Fertilizer Update : जालना जिल्ह्यात बी-बियाणे, खते व कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण आणि लिंकिंग करणाऱ्या दुकानदारांवर भरारी पथकांनी अचानक भेटी देऊन कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी दिले.

कृषी विभागाच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे सोमवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री. सावे बोलत होते.

आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांची बैठकीला उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले, ‘‘कृषी निविष्ठांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर खते- बियाण्यांची मुबलक उपलब्धता होईल. दुकानदाराने शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना बंधने घालू नयेत, तसेच शेतकऱ्यांची तक्रार येताच कृषी विभागाने तत्काळ दखल घेत कारवाई करावी. या खरीप हंगामापासून केवळ एका रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीकविमा काढता येणार आहे. याबाबत जनजागृती करावी.’’

Minister Atul Save
Fertilizer Shortage : खानदेशात ‘पोटॅश’ची अभूतपूर्व टंचाई

श्री. सावे म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासनाने बँक अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर उपलब्ध होण्यासाठी निर्देशित करावे. जे बँक अधिकारी पीक कर्ज वाटपाच्या कामात हयगय करतील त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी.

जिल्ह्यात अवेळी पावसाने व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत.’’ दरम्यान, जालना जिल्ह्यात ७.७२ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, खरीप हंगामात सरासरी ६.१९ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते.

प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कापसे यांनी केले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, कृषी विभागाचे अधिकारी, बियाणे, खते व कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री सावे म्हणाले...

- कृषिपंपाची ५ हजार २६९ प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा.

- ‘शेतकरी अपघात सुरक्षा योजना’ राबविण्यासाठी काटेकोर नियोजन करा.

शेतकऱ्यांचा सत्कार

बैठकीत रब्बी हंगाम पीकस्पर्धा -२०२१-२२ तील विजेते शेतकरी भागवत प्रकाश देशमुख, मंगल प्रभूसिंग चव्हाण, दारासिंग भगवानसिंग चव्हाण, संदीप विजयकुमार दायमा, लहानू अंबादास आटोळे, भरत मोकिंदा भोईटे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सामाजिक वनीकरण विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार-२०१९चे (व्यक्ती, ‍विभागस्तर) प्रथम क्रमांकाचे विजेते कुंदन बाळकृष्ण देशमुख यांन सन्मानित करण्यात आले. बैठकीनंतर जडाई माता शेतकरी गट, रेवगाव यांना सोयाबीन टोकन यंत्राचे वितरण करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com