चाकाटी गावाला तालुकास्तरीय आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

प्रथम क्रमांकासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत गाव पाहणी
चाकाटी गावाला तालुकास्तरीय आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार
R. R. PatilAgrowon

इंदापूर : तालुक्यात २०२१-२२ या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर. आर. (आबा) पाटील (R. R. Patil) सुंदर गाव पुरस्कारात (Beautiful Village Award) नीरा नदी (Nira River) किनारी वसलेल्या चाकाटी गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुकास्तरीय समितीने गुणांकन व मूल्यांकनाच्या आधारे चाकाटी गावाला प्रथम क्रमांक देण्यात आला. तर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत नुकतीच गावाची पाहणी करण्यात आली.

गावच्या पाहणीमध्ये चाकाटी गावातील अंतर्गत स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, वैयक्तिक शौचालय, शोषखड्डे, बायोगॅस, ग्रामपंचायत सर्व अभिलेख, रोजगार हमी योजनेची कामे, इत्यादीची पाहणी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासनाचे कमलाकर रणदिवे, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केली. या वेळी ज्येष्ठ नेते केशव मारकड, सोसायटीचे चेअरमन रामचंद्र मारकड, ग्रामपंचायत सदस्य आबासो मारकड, ग्रामपंचायत सदस्य समाधान घोडके, पोलिस पाटील भालचंद्र मारकड, संजय रूपनवर, विजय बबन मारकड, केशव वाघमोडे, महेंद्र कांबळे, लखन घोडके, गणपत मारकड, ग्रामसेवक स्वप्नील गायकवाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच संजय बबन रूपनवर म्हणाले, की आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी चाकाटी गावाची निवड होण्यामागे गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अधिकारी आणि ग्रामसेवक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्याने गावाची इंदापूर तालुक्यात व आत्ता पुणे जिल्ह्यामध्ये सुंदर गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये चाकाटी गावाची ‘सुंदर गाव’ म्हणून निवड होईल अशी अपेक्षा आहे.

तसेच या निवडीमुळे चाकाटी गावाच्या विकासाचा कायापालट होईल. गावात याअगोदर शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून विकास कामे झाली असून, ही विकासकामे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून तसेच इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ रूपनवर यांच्या सहकार्याने मंजूर करून करण्यात आली आहेत. यामुळे सुंदर गाव करण्यासाठी यांचाही मोलाचा वाटा लाभला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com