Mumbai Rajbhavan : तळवडेच्या खणाच्या तोरणांनी वाढवली राजभवनाची शोभा

तालुक्यातील दुर्गम भागात, सह्याद्रीच्या कुशील वसलेल्या तळवडेतील महिलांनी तयार केलेल्या खणाच्या तोरणांनी मुंबईच्या राजभवनाची शोभा वाढवली आहे.
Mumbai Rajbhavan
Mumbai RajbhavanAgrowon

चिपळूण, जि. रत्नागिरी ः एखादी वस्तू आपण मेहनत घेत जीव लावून केल्यास त्यामध्ये अधिक कल्पकता येते. ती सर्वांच्या नजरेतही भरली जाते. याचा प्रत्यय तालुक्यातील तळवडे येथील आदर्श स्वयंसहायता समुहाने तयार केलेल्या तोरणाच्या बाबतीत आला. तालुक्यातील दुर्गम भागात, सह्याद्रीच्या कुशील वसलेल्या तळवडेतील महिलांनी तयार केलेल्या खणाच्या तोरणांनी मुंबईच्या राजभवनाची शोभा वाढवली आहे.

Mumbai Rajbhavan
Weed Crop : तणनियंत्रणासाठी सोपे अवजार, गवत तलवार

या महिलांनी तयार केलेली तोरण राज्यपालांच्या पसंतीस उतरल्याने तळवडेच्या महिलांची ६०० तोरणे राजभवनावर पोहोच झाली आहेत. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उप्तादित मालांसाठी तयार केलेल्या बुकलेटने ही किमया साधली आहे.या तोरणातून कोकणी ग्रामीण संस्कृतीचे दर्शनही होते.

महिलांनी एकत्र येत विविध उद्योग व्यवसाय सुरू करावेत. त्यांना रोजगाराची साधने मिळावीत. महिलांचे जीवनमान सुधारावे, यासाठी गावा-गावात महिला बचत गटांची स्थापना झाली. गेल्या काही वर्षापासून बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण सुरू आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दीपावलीसाठी तोरणांची आवश्यकता होती.

उमेदचे सीईओ डॉ. हेमंत वसेकर, मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत यांनी बुकलेटच्या पाहणीनंतर राज्यपालांना खणांच्या तोरणांची माहिती दिली. तळवडेतील महिला बचत गटाने तयार केलेली सहा प्रकारची तोरणे नमुन्यादाखल राजभवनात पाठविण्यात आली. ही राज्यपालांच्या पसंतीस उतरल्याने पहिल्या टप्प्यात २०० तोरणांचा पुरवठा या महिला बचत गटाने केला. ती तोरणेही कमी पडल्याने पुन्हा ४०० तोरणे देण्याची सूचना तळवडेतील आदर्श स्वयंसहायता गटाला केली.

या महिलांनी सलग तीन दिवस १८ ते २० तास काम करून विक्रमी वेळेत तोरणे राजभवनावर पोहोचवली. कोकरे प्रभागाचे समन्वयक शुभम जाधव यांनी गटाला चांगले सहकार्य केले. पहिल्या टप्प्यात ५ तर नंतर १० महिलांनी तोरणांचे काम करीत दर्जेदार तोरणांची निर्मिती केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com