
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या सेवा हमी कायद्यानुसार जलसंपदा विभागाने आपल्या खात्यांतर्गत असणाऱ्या दहा सेवा ऑनलाइन (Online Agriculture Services) केल्या आहेत. या सेवा जलसंपदा विभागाच्या wrd.mahaonline.gov.in व aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून यापुढे सेवाबाबतचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित ऑनलाइन स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभाग (उत्तर)चे कार्यकारी अभियंता सुरेश नाईक यांनी केले आहे. (Department of Water Resources)
या दहा सेवांमध्ये पाणीवापर संस्थेस देय पाणी हक्क मंजुरी देणे, पाणीवापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, बिगरसिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे, लाभक्षेत्राचा दाखला देणे, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, कटक मंडळे यांना घरगुती पाणीवापर परवाना देणे, महानगरपालिका, खासगी विकासक, विशेष नगरविकास प्रकल्प यांना घरगुती/ औद्योगिक पाणीवापर परवाना देणे, औद्योगिक प्रयोजनासाठी पाणीवापर परवाना देणे, नदी व जलाशयापासून अंतराचा दाखला देणे व उपसा सिंचन परवानगी देणे या सेवांचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.