New Sand Policy : नवीन वाळू धोरणासंदर्भात निविदा प्रक्रिया

Sand Policy : राज्यात वाळू-संदर्भात नवीन धोरणाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्यानुसार, नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे.
Sand Rate
Sand RateAgrowon

Nashik News : राज्यात वाळू-संदर्भात नवीन धोरणाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्यानुसार, नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे.

त्याप्रमाणे, जिल्ह्यातही नवीन वाळू धोरणासंदर्भात नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात १३ घाटांवरील वाळूचे लिलाव होणार आहेत.

शासनाच्या या नवीन धोरणामुळे नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध होणार आहे. दरम्यान, वाळू घाटांसाठी बुधवारपासून (ता. ३) निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून ९ मे रोजी या निविदा उघडण्यात येतील.

गेल्या काही वर्षांपासून वाळू आणि त्या माध्यमातून शासनाचा बुडणारा महसूल यासंदर्भात नव्याने धोरण राबविण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यानुसार, राज्य शासनाने अखेर नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी १५ मेपासून केली जाणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या उपस्थित पार पडली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण उपस्थित होते.

Sand Rate
Raigad Sand Update : रायगड जिल्‍ह्यात लवकरच वाळू आगार

बैठकीत नवीन वाळू धोरणाविषयी चर्चा करण्यात येऊन नव्याने राबविण्यात येणाऱ्या निर्णयांबाबत सूचना करण्यात आल्या. त्यानुसार, पर्यावरण संवर्धनविषयक परवानग्या घेतलेले नाशिक जिल्ह्यातील १३ वाळू घाट पहिल्या टप्प्यात निश्चित करण्यात आले आहेत.

यात मालेगाव, कळवण, देवळा आणि बागलाण या चार तालुक्यांमधील वाळू घाटांचा समावेश करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील पाच घाटांवरील वाळूचा उपसा या पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

तसेच, या संबंधित सर्व १३ वाळू घाटांमधून ९० हजार ब्रास वाळू मिळणे अपेक्षित असल्याचे जिल्हा खनीकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, वाळू घाटांपासून जवळच साठवणुकीचा डेपोही असणार आहे.

त्याप्रमाणे सहा डेपोंची जागा जिल्हा प्रशासनाने निश्चित केली असून वाहतुकीचा खर्च वाढू नये, यासाठी वाळू घाटापासून जवळच हे डेपो राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com