Tendupan : तेंदूपानांची प्रोत्साहन मजुरी मिळणार

मागील तीन वर्षांत ३३ कोटी इतका प्रशासकीय खर्च दरवर्षी तेंदूपाने संकलनाकरिता होत आहे.
Tendupan
TendupanAgrowon

Gadchiroli News : वनक्षेत्रात तेंदूपाने संकलन व विल्हेवाटीची कार्यवाही वनविभागाद्वारे करण्यात येते. तेंदू संकलन (Tendu collection) करणाऱ्या मजुरांना निश्‍चित केलेली मजुरी परवानाधारकांकडून दिली जाते.

याव्यतिरिक्त तेंदूपाने विक्रीतून प्राप्त होणारे स्वामित्व शुल्क व प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून वितरित करण्याची तरतूद असून, ही प्रोत्साहन मजुरी लवकरच मिळणार आहे.

प्रचलित धोरणानुसार तेंदूपाने संकलनाकरिता ई-लिलाव प्रक्रियेतून प्राप्त होणाऱ्या स्वामित्व शुल्कातून २४०६-०४५२ या तेंदूच्या लेखाशीर्षाअंतर्गत झालेले वेतन, मजुरी, कार्यालयीन खर्च आदी प्रशासकीय खर्च अधिक १२ टक्के याप्रमाणे वजा करून त्या हंगामाची तेंदू संकलन करणाऱ्यांना अदा करायची प्रोत्साहनार्थ मजुरी ठरवण्यात येते.

तथापि, तेंदू संकलनाचा कालावधी फक्त एक महिन्याचा असताना प्रशासकीय खर्च संपूर्ण वर्षासाठी वजा करणे, वनविभागास तेंदू विक्रीतून कमी दर मिळण्याबाबत स्थानिकामध्ये निर्माण होणारी नाराजी, तेंदू संकलन करणाऱ्यांना एक वर्ष उशिराने प्रोत्साहन मजुरी मिळणे आदी नकारात्मक बाबीवर तोडगा काढणे गरजेचे आहे.

Tendupan
Sunflower Cultivation : वसमत तालुक्यात शेतकरी सूर्यफूल पिकाकडे वळले

तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून वेळेत वाटप करण्याच्या अनुषंगाने १ नोव्हेंबर २००७ च्या तेंदू संकलन धोरणात आवश्यक बदल करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेस सादर करण्यात आला होता.

३१ जानेवारी २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सन २०२२ च्या हंगामापासून पुढे तेंदूपाने संकलनाद्वारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजा न करता संबंधित तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहन मजुरी म्हणून वाटप करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.

मागील तीन वर्षांत ३३ कोटी इतका प्रशासकीय खर्च दरवर्षी तेंदूपाने संकलनाकरिता होत आहे.

या मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे साधारणपणे एक ते दीड लाख कुटुंबांना तेंदूपाने संकलनाद्वारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची प्रशासकीय खर्चाची वजा न करता प्रोत्साहनात्मक मजुरीची रक्कम वनविभागाकडे जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित तेंदू संकलन करणाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे.

२२ हजार ३२७ कुटुंबांना लाभ....

गडचिरोली वनवृत्तांतर्गत आलापल्ली, गडचिरोली, वडसा या तीन वनविभागांत २०२२ च्या तेंदू हंगामात एकूण २५ तेंदू घटक विक्रीपासून ११.८० कोटी रुपयांचा महसूल मिळालेला असून, संपूर्ण महसूल तीनही वनविभागांत तेंदूपाने संकलन करणारे एकूण २२ हजार ३२७ कुटुंब प्रमुखांना याचा आर्थिक लाभ मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. किशोर मानकर यांनी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com