कार्यकारी संचालकपदाची वयोमर्यादा वाढवावी

साखर उद्योगात कार्यरत अधिकाऱ्यांची मागणी
कार्यकारी संचालकपदाची वयोमर्यादा वाढवावी
Sugar MillAgrowon

पुणे : सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकपदाची पात्रता यादी निकष नियमावलीमध्ये कमाल वयोमर्यादेची असलेली वयाची अट ५० वरून ५५ वर्षे करावी, अशी मागणी राज्यातील साखर उद्योगात कार्यरत अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघामार्फत सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाकडे केली.

राज्य शासनाने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १८ एप्रिल २०२२ रोजी परिपत्रक काढून राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालकपदाच्या निकष नियमावलीमध्ये कमाल वयोमर्यादा ५० वर्षे अशी केलेली आहे. परंतु राज्यातील सहकारी साखर कारखान्यांतील काही खातेप्रमुख या वयोमर्यादेमुळे कार्यकारी संचालक पात्रतेच्या परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. म्हणून वयोमर्यादेची असलेली वयाची अट ५५ वर्षे करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने संचालक मंडळाच्या १० मे २०२२ रोजीच्या सभेमध्ये यावर सविस्तर चर्चा केली. कार्यकारी संचालकांच्या पॅनेलसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे ऐवजी ५५ वर्षे करण्याचा ठराव मंजूर करून तो राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविला आहे.

नवीन पॅनेल करण्याची प्रक्रिया सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. त्यामुळे बरेच अनुभवी उमेदवार इतर सर्व निकष पूर्ण करूनही या संधीपासून वंचित राहत आहेत. कोविडमुळे दोन वर्षांचा अकारण व्यय झाला. त्या दरम्यान वयोमानाप्रमाणे पात्र असणाऱ्या मात्र आता अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये. म्हणून उमेदवारांची कमाल वयोमर्यादा वाढवावी, असे ठरावात नमूद केले आहे.

विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती आहे. न्याय मिळवण्यासाठी अन्यायग्रस्त खातेप्रमुखांनी संघटित होऊन सरकार दरबारी आणि न्यायालयात दाद मागणे गरजेचे आहे.
किरण शेलार, चीफ केमिस्ट, श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना. सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com