कृषिमंत्र्यांच्या मध्यस्थीने पुणतांब्यातील आंदोलन स्थगित

अजित पवारांशी दूरध्वनीवरून चर्चा; सोमवारी बैठक
कृषिमंत्र्यांच्या मध्यस्थीने पुणतांब्यातील आंदोलन स्थगित
Farmer ProtestAgrowon

नगर : राज्य शासनाचे शेतकरी प्रश्‍नाकडे (Farmer Issue) लक्ष वेधण्यासाठी पुणतांबा (ता. राहाता) येथे चार दिवसांपूर्वी सुरू केलेले धरणे आंदोलन (Farmer Protest) शनिवारी (ता.४) स्थगित करण्यात आले. कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आंदोलनकर्त्यांची बंद दाराआड दोन तास चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली. नंतर सोमवारी (ता. ६) शेतकरी प्रश्‍नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे.

पुणतांबे येथील गावकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतकरी प्रश्‍नावर एल्गार पुकारला आहे. पंधरा दिवसांपूर्वी बैठक घेऊन व २३ मे रोजी ग्रामसभा घेऊन उसाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावे, शिल्लक उसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे, कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा. कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी पुणतांबा येथील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन राज्य शासनाला निवेदन दिले.

सात दिवसांनंतरही दखल घेतली नसल्यामुळे बुधवार (ता.१) पासून गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनाला भेट दिली होती. शनिवारी कृषिमंत्री दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुणतांबा येथे भेट दिली. सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुभाष वहाडणे, सुहास वहाडणे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, नामदेव वहाडणे, सुभाष कुलकर्णी आदींशी दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यानंतर शेतकरी प्रश्‍नावर सोमवारी (ता.६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक होणार असल्याचे सांगून धरणे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com