Natural Industry Group : ‘नॅचरल’ची यंदा वार्षिक उलाढाल ८५० कोटी

अन्न आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी भविष्यात शेतीचे महत्त्व वाढणार आहे. या वर्षीची नॅचरल उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल ८५० कोटी रुपये आहे.
Natural Industry Group
Natural Industry GroupAgrowon

शिराढोण : अन्न आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी भविष्यात शेतीचे महत्त्व वाढणार आहे. या वर्षीची नॅचरल उद्योग समूहाची (Natural Industry Group) वार्षिक उलाढाल ८५० कोटी रुपये आहे. कारखान्यांचे प्रगतीसाठी पुढच्या तरुण पिढीने जिम्मेदारीने कार्य हाती घ्यावे, असे आवाहन वयाच्या सत्तराव्या वर्षात पदार्पण करताना नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी केले.

‘नॅचरल’च्या वतीने सोमवारी (ता. २४) श्री. ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान कार्यक्रमासाठी प्रवर्तक किशोर डाळे यांनी पुढाकार घेतला.

Natural Industry Group
Women's Self-Help Group : रत्नागिरीच्या शुभांगी राजवीर यांनी बचत गटांच्या माध्यमातून केली शेतीची प्रगती

श्री. ठोंबरे म्हणाले, की नॅचरल उद्योग समूहाने गेल्या २२ वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. आणि शेतकरी आणि सर्व सामान्यांचे जिवन मान उंचावण्याचा प्रयत्न केला. श्री साई ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे सभासद लक्ष्मण पालकर यांची मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यांना पतसंस्थेच्या वतीने वैद्यकीय खर्चासाठी ५० हजार रुपये मदत देण्यात आली. तसेच संस्थेच्या वतीने पीक कर्जदार शेतकरी रविकुमार गायकवाड यांचे अपघाती निधन झाले.

या शेतकऱ्याची कर्ज बाकी ऊसबिलातून वसूल झाली. दरम्यान, संस्थेने या शेतकऱ्यांचा अपघाती विमा काढला होता. विमा कंपनीच्या वतीने श्रीमती मनीषा गायकवाड यांना नव्वद हजारांचा धनादेश देण्यात आला.

या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्‍वर काळदाते, संचालक अनिल ठोंबरे, पांडुरंग आवाड, संभाजी रेड्डी, सतीश देशमुख, उद्योजक अशोक भुतडा, डॉ. आनंद गोरे, विष्णू डोलारे, विष्णू मोहिते, किशोर डाळे, दिलीपराव भिसे, विठ्ठलराव शितोळे, सौ. कांचनमाला संगवे उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com