Shri Ravi Shankar : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार पारंपरिक देशी बियाणे जोपासणार

जीवनात भक्ती, विश्‍वास नसेल तर माणूस वेगवेगळ्या नशांच्या आहारी जातो. त्यामुळे जनकल्याणाचे काम हातात घेऊया. प्रेम हे जीवनाचे सार आहे.
Shri Ravi Shankar
Shri Ravi ShankarAgrowon

Akola News : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने जलपुनर्भरणाच्या उपक्रमानंतर आता शेतकऱ्यांसाठी पारंपरिक देशी बियाण्यांची बँक (Seed Bank) तयार करण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्याकडे असे वाण असतील त्यांनी ते यासाठी द्यावेत, असे आवाहन श्री श्री रविशंकर (Shri Ravi Shankar) यांनी येथे केले.

येथे सोमवारी (ता.२७) रात्री महासत्संग आयोजित करण्यात आला होता. या वेळी रविशंकर हे संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षात देशात ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. स्वयंसेवकांच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये जलपुनर्भरणाची कामे केली गेली.

यामुळे शेतीला पाणी मिळाले. उत्पादनात वाढ झाली. याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मागील वर्षी विदर्भातून १००० शेतकरी बंगळूरच्या आश्रमात आले होते. त्यांच्या चेहऱ्यांवरील हास्य हे या कामाचे फलित झाल्याचे दिसून आले.’’

Shri Ravi Shankar
Seed Royalty : ‘एफपीसीं’च्या बियाण्यांवरील स्वामित्व शुल्क हटविले

रविशंकर पुढे म्हणाले, ‘‘जीवनात भक्ती, विश्‍वास नसेल तर माणूस वेगवेगळ्या नशांच्या आहारी जातो. त्यामुळे जनकल्याणाचे काम हातात घेऊया. प्रेम हे जीवनाचे सार आहे. महाराष्ट्रात अशी भक्तीची लहर वर्षानुवर्षे निर्माण झालेली आहे. येथे संतांनी समाजाला जोडले.

आज अज्ञानी लोक जात, धर्माच्या नावावर फूट पाडतात. मात्र ज्ञानी लोक हे जोडण्याचे काम करतात. सध्या तणावमुक्त जीवन कसे जगता येईल हे महत्त्वाचे झालेले आहे.

यासाठी योग, प्राणायाम, क्रिया कराव्यात. त्यामुळे आपली संकल्पशक्ती जागरूक होईल. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने भक्तांच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू केले आहेत.’’

Shri Ravi Shankar
Cucumber Seed : काकडीच्या सदोष बियाण्याची विक्री

‘कोरोना हा मानवनिर्मित’

दोन वर्षे संपूर्ण जगात धुमाकूळ घालणारा कोरोना हा मानवनिर्मित आहे, हे मी सुरुवातीपासूनच म्हणत आलेलो आहे. त्यावर आता जगानेही शिक्कामोर्तब केले. कोरोनाच्या काळात संपूर्णपणे बरे करणारे आयुर्वेदिक औषधी आपण तयार केली.

याला विदेशातील विद्यापीठांनीही आता मान्य केले, की कुठलीही लस ही ६० टक्क्यांपर्यंत यश मिळवू शकते. मात्र हे औषध १०० टक्क्यांपर्यंत यश मिळवू शकते. हे औषध आजार रोखण्यासाठी मोठे साह्यभूत ठरू शकते, हे मान्य झाले आहे.

या वर्षी जी-२० च्या माध्यमातून जगभरातील नेते भारतात येत आहेत. ४२ वर्षांपूर्वी जेव्हा आपण हे अभियान सुरू केले, तेव्हा त्याचे महत्त्व मानले जात नव्हते. आज संपूर्ण जगातील एकतृतीयांश लोक योग, प्राणायाम करू लागले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com