Jalgaon APMC Election Update : युतीमध्ये जागांवरून घोडे अडले, महाविकास आघाडीचा संपर्क वेगात

जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीसंबंधी सेना भाजपची युती अद्याप झालेली नाही.
Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc ElectionAgrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीसंबंधी (Jalgaon Market Committee) सेना भाजपची युती अद्याप झालेली नाही. भाजपची ताकद नसताना त्यांना निम्म्या जागा कशा द्यायच्या, असा मुद्दा सेनेने लावून धरला आहे.

यामुळे जागावाटप फिस्कटले आहे. दुसरीकडे जातीय समीकरणे साधण्यातही सेनेची डोकेदुखी होत आहे.

निवडणुकीत निधीचा मुद्दाही यापूर्वीच समोर आला आहे. कारण मतदारांना आपल्याकडे आणण्यासाठी वित्तीय रसदही पुरवावी लागणार आहे. त्यासाठी काही उमेदवार राजी झाले आहेत.

तर अनेकांनी आपल्या जातीतून आपण कसे ताकदवान आहोत, किती मते आपल्यामागे आहेत, हा मुद्दा पुढे करून सेनेतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपनेही ऐनवेळी युती करण्यासंबंधी नकार दिल्याचे चर्चिले जात आहे.

Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc Election : जो निधी आणेल, त्यालाच पॅनेलमध्ये स्थान

त्यासाठी निम्म्या जागा हव्यात, आपण कुठलाही खर्च करणार नाही, पालकमंत्री गुलाबराव पाटील व इतरांना आपली गरज असेल तर आम्हाला सोबत घ्यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे.

कारण भाजप विधानसभा निवडणुकीत कोणतीही मदत करीत नाही, भाजपची मंडळी आपली उपद्रव मूल्ये दाखवून विधानसभेच्या वेळेस अडचणी उभी करते, असे सेनेतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

युतीत इच्छुक अनेक

युतीत इच्छुक अनेक आहेत, पण निधी द्यायला कुणी तयार नाही. फुकटची पदे किती जणांना द्यायची, असा मुद्दा नेत्यांनी उपस्थित करून आपापसात ठरवा, असा संदेश इच्छुकांना दिला. यामुळे काही जणांनी माघार घेतली आहे.

परंतु युतीमध्ये गुर्जर व मराठा समाजातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. ही संख्या कशी जुळवायची व समान जागा वाटप कसे करायचे, हादेखील अडचणीचा मुद्दा पालकमंत्री गुलाबराव पाटील व इतरांसमोर आहे.

Jalgaon Apmc Election
Sangli Apmc Election : सांगली बाजार समितीच्या माजी संचालकांच्या अपात्रतेवर उद्या सुनावणी

यामुळे युती झालेली नाही. दुसरीकडे भाजपचे स्वतंत्र पॅनल असेल, असेही चर्चिले जात आहे. माघारी सुरू होऊन काही दिवस झाले तरीदेखील युतीची घोषणा न झाल्याची बाब महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली आहे.

महाविकास आघाडीचे पॅनल जवळपास निश्चित झाले आहे. त्यात कोळी, मराठा यांना समान आणि लेवा पाटीदार व गुर्जर समाजासही समान जागा देण्याची रणनीती आखली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com