Waqf Institutions : वक्फ संस्थांचाही अर्थसंकल्प सादर होणार

Waqf religious places : वक्फ धार्मिक स्थळे आणि संस्था विश्वस्तांना आता वक्फ मंडळाला आता वार्षिक अर्थसंकल्प द्यावा लागणार आहे.
Waqf Institutions
Waqf InstitutionsAgrowon

Waqf Institutions Roha News : वक्फ धार्मिक स्थळे आणि संस्था विश्वस्तांना आता वक्फ मंडळाला आता वार्षिक अर्थसंकल्प द्यावा लागणार आहे. त्यानुसार कोकणातील तीन हजार संस्थांना नोटिसा पाठवल्या आहे. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांत अर्थसंकल्प सादर करण्याच्या सूचना आहेत.

याशिवाय वक्फ मिळकती भाडे तत्त्वावर देण्यासंदर्भातील नियमावलीही वक्फ मंडळाकडून तयार केली आहे. याबाबतचे पत्र आणि नोटीस वक्फ धार्मिक स्थळे आणि संस्था विश्वास्तांना पाठवण्यात आल्या.

राज्यातील मशीद, मदरसा, दरगाह या वक्फ धार्मिक संस्थांच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने १९९५ मध्ये महाराष्ट्र वक्फ ऑफ बोर्डची स्थापना केली. त्‍या अनुषंगाने संस्थेच्या मशीद, मदरसा, दरगाह यांची नोंद छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य वक्फ ऑफ बोर्ड या कार्यालयात करणे गरजेचे आहे.

Waqf Institutions
Rural Development In Roha : रोह्याच्या विकासाला गती

पूर्वी जिल्ह्यातील अलिबाग येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात यासंदर्भातील कामकाज चालायचे. आता छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आता याच वक्फ बोर्डाला धार्मिक स्थळे आणि संस्था विश्वस्तांना अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे.

कोकणातील तीन हजार संस्थांना नोटिसा पाठवल्या. धार्मिक स्थळासह अन्य वक्फ संस्थांना वर्षभरातील कामे, सर्व प्रकारच्या खर्चासंदर्भात नियोजन करावे लागणार आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील सहा जिल्ह्यांतील विविध संस्थांना तीन हजार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या वक्फ संस्थांनी महाराष्ट्र राज्य वक्फ ऑफ बोर्ड छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यालयात सर्व कागदपत्रे जमा करून संबंधित प्रशासनाला सहकार्य करावे.
अतिक खान, कोकण विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ ऑफ बोर्ड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com