वशिलेबाजीचे बदलते स्वरूप

न्याय (Justice) आणि वशिलेबाजी ही अशी एकमेकांच्या विरोधात असल्याचे यावरून स्पष्ट होते. किंबहुना, फार किरकोळ काम आहे असा फोन एखाद्या लोक प्रतिनिधींचा आला, की अधिकारी सावध होतात.
indian Society
indian SocietyAgrowon

शेखर गायकवाड

१०० वर्षांपूर्वी वशिलेबाजी करण्याची वृत्ती समाजात कमी होती असे मानता येईल. त्या वेळी शिक्षणाचे प्रमाण फार कमी होते. शिक्षणाचे प्रमाण वाढल्यानंतर न्याय साधा सोपा होईल. कारण शिकलेल्या लोकांना चुकीचे काय बरोबर काय हे लवकर कळेल, असा शिक्षणतज्ज्ञांचा अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एकूण अर्जाची छाननी केली असता त्यामध्ये ही बाब लक्षात आली, की १०० पैकी केवळ ९ टक्के अर्ज हे थेट जिल्हाधिकारी यांच्या अधिकारासंबंधी होते. ९१ टक्के अर्जामध्ये भलत्या व्यक्तीकडे असलेल्या कामाच्या प्रति कलेक्टरकडे देणे, त्याचे उत्तर मागणे, ते उत्तर नाही मिळाले म्हणून उपोषणाला बसणे आणि काहीच दाद नाही दिली, तर निदान अधिकाऱ्यांना त्रास देणे अशी वृत्ती दिसून आली.

एकदा भारताच्या राष्ट्रपतींसह एकूण २७ लोकप्रतिनिधींच्या नावे दिलेला एक अर्ज कलेक्टर ऑफिसला आला होता. त्यामध्ये तलाठी जाणीवपूर्वक ७/१२ देत नसल्याबाबत तक्रार होती. त्याचे उत्तर तलाठ्याने जे दिले त्यामध्ये, अर्जदार व्यक्ती गावातील खातेदार नाही. कोणतीही जमीन त्याच्या नावावर नाही.

हक्क संपादनाबाबत सुद्धा कोणताही अर्ज कार्यालयात केलेला नाही. असे उत्तर एकूण २७ लोकांना वेगवेगळ्या वेळी पाठवावे लागले. थोडक्यात काय, तर जी व्यवस्था आहे ती मोडून काही ठरावीक लोक व्यवस्थेपेक्षा मोठे होऊ पाहत आहेत, आणि त्यामुळे मूळ व्यवस्थाच कोलमडून जाण्याच्या अवस्थेत आहे.

indian Society
ग्रामीण अर्थकारणास डेअरी क्षेत्रामुळे चालना : नरेंद्र मोदी

पूर्वीच्या काळी वशिलेबाजीचे स्वरूप अतिशय मर्यादित व छोटेखानी होते. सणावाराचे वेळी रॉकेल पुरत नसल्यामुळे आणखी दोन लिटर रॉकेल देण्यास सांगावे किंवा ओळखीने शाळेत प्रवेश मिळवून द्यावा असे वशिलेबाजीचे स्वरूप असायचे. परंतु समाज इतका गुंतागुंतीचा निर्माण झाल्यावर वशिलेबाजीचे स्वरूपसुद्धा बदलले.

नाशिकला मी असताना माझ्याकडे एकदा एक मोठे शिष्टमंडळ आले आणि फार मोठा धार्मिक उत्सव आम्ही करीत असून, त्याचे निमंत्रण द्यायला आलो आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मूळ मुद्याला शिष्टमंडळाने हात घातला. पाच दिवस चालणाऱ्या या धार्मिक उत्सवासाठी स्वयंपाकासाठी रोज ५० घरगुती वापरासाठी सिलिंडर आम्हाला मंजूर करावेत, अशी त्यांची मागणी होती. कायद्यानुसार यासाठी घरगुती वापराचे सिलिंडर देता येत नाहीत, व्यापारी तत्त्वावरचे सिलिंडर वापरले पाहिजे असे सांगितल्यावर मंडळी नाराज झाली.

indian Society
Agricultural Census: कृषी गणनेसाठी होणार प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर

एवढ्या मोठ्या धार्मिक महोत्सवाला म्हणून अमुक-अमुक मंत्री त्यासाठी येणार आहेत. असे त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना म्हणालो, धार्मिक कार्यासाठी चोरून घरगुती सिलिंडर वापरणे हे परमेश्‍वरालाच मान्य होणार नाही! न्याय (Justice) आणि वशिलेबाजी ही अशी एकमेकांच्या विरोधात असल्याचे यावरून स्पष्ट होते. किंबहुना, फार किरकोळ काम आहे असा फोन एखाद्या लोक प्रतिनिधींचा आला, की अधिकारी सावध होतात. सहज सांगितलेल्या कामात काय गोम असेल ते सांगता येत नाही.

सर्व सामान्य लोकांची ९० टक्के कामे ही नियमानुसार व कायद्याने आपोआप होणारी असतात. पण राहिलेली १० टक्के कामे मात्र जी नियमात बसणारी नसतात त्यासाठी आटापिटा करून प्रचंड वशिलेबाजी करून ते काम करून घेण्याकडे लोकांचा कल असतो. ‘आमच्या कार्यकर्त्याकडून चुकून एक घटना झाली आहे त्याला मदत करा,’ असे एका लोक प्रतिनिधीने एका अधिकाऱ्याला फोन करून सांगितले. प्रत्यक्षात जे किरकोळ कारण लक्षात आले ते म्हणजे त्याने केलेला नातेवाइकाचा खून!

indian Society
FCI: तेलंगणात तांदूळ प्रक्रियेसाठी मुदतवाढ

१९६०-७० पर्यंत चुकीचे काम सांगणारे लोक नम्र असत आणि ‘आमच्या पोटावर मारू नका,’ अशी भाषा बोलत असत. आता त्या विरुद्ध सगळ्यात चुकीचे व बेकायदेशीर काम असणारा माणूस, ‘तुम्ही काय धंदे करता हे आम्हाला माहीत आहे!’ अशी भाषा बोलू लागले आहेत. शाळेच्या प्रवेशापासून सोईच्या ठिकाणी बदली करेपर्यंत, नियमात बसत नसताना, कर्ज मंजूर करून घेण्यासाठी, कर्ज रक्कम वाढविण्यासाठी, जमिनीच्या अटी-शर्ती काढण्यासाठी, इच्छित हेतू साध्य करण्यासाठी, दंड कमी करण्यासाठी, शिक्षा कमी करण्यासाठी अशा असंख्य कामासाठी लोक वशिलेबाजी करीत असतात.

या सगळ्यांवर ‘वाटले तर मी ॲफिडेव्हिट करून देतो’ असा एक नामी उपाय या लोकांकडून सुचविला जातो. किंबहुना, संपूर्ण भारतात सगळ्यात प्रसिद्ध काही गोष्ट असेल, तर ती म्हणजे प्रतिज्ञापत्र हे आहे. शपथेवर खोटे बोलण्यासाठी अमेरिकेसारख्या देशात ३० वर्षे जेलमध्ये जाण्याची शिक्षा आहे व खून केल्यास आठ वर्षांची शिक्षा आहे. सर्व गुन्हे हे खोटे बोलल्या मुळेच निर्माण होतात यासाठी मानवी स्वभावाचा अभ्यास करून हे कायदे केले आहेत.

indian Society
Water Pollution: जलप्रदूषणामुळे पंजाबला शंभर कोटींचा दंड

जातीचा दाखला (Cast Certificate) काढताना एकदा एका माणसाने तहसीलदारांना माझ्या मुलाचे त्याच जातीचा असल्याचे प्रतिज्ञापत्र देतो असे सांगितले. त्यावर तहसीलदार त्याला म्हणाले, की वडिलांकडून मुलाला जात येते, मुलाकडून वडिलांकडे नाही! तर्कशास्त्राला सुद्धा आवाहन देणारी ही वशिलेबाजी कुठल्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही.

ठाणेच्या जिल्हा परिषदेत केवळ ३० टक्के घरभाडे जास्त मिळते म्हणून सासूची सेवा करण्यासाठी बदली कल्याण येथे करावी अशी मागणी शेकडो शिक्षकांनी केली होती. अचानक सासूची सेवा एवढे लोक का करताहेत असा प्रश्न पडला. प्रत्यक्षात या मागची प्रेरणा म्हणजे जास्त मिळणारे घरभाडे हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com