Nana Patole : मुख्यमंत्र्यांनी सहकारमंत्री सावेंची हकालपट्टी करावी; कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

मंत्रिपदाच्या शपथेचा भंग सावे यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याने सावेंची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी, अशी मागणी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
Nana Patole
Nana PatoleAgrowon

Atul save: महाराष्ट्रात सहकारी संस्था कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने मेहनतीने उभारल्या आहेत.

भाजपला हेच खूपत असल्याने आता केवळ भाजप जिल्हाध्यक्षांच्या शिफारशीवर नोंदणी करण्याचा फतवा सहकारमंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी काढला.

मंत्रिपदाच्या शपथेचा भंग सावे यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावेंची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी, अशी मागणी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या नोंदीसाठी भाजप जिल्हाध्यक्षाच्या शिफारशीची अट घालण्याचा अजब निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.

शुक्रवारी (ता.१०) सावे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना या निर्णयासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

नव्या सहकारी संस्थांची नोंदणी करताना भाजप जिल्हाध्यक्षाचे शिफारस पत्र लक्षात घेऊनच नोंदणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी साम टीव्हीच्या प्रतिनिधींना दिली.

सहकार संस्थांच्या नोंदणीचा अधिकार जिल्हा निबंधक आणि सहकार आयुक्त घेतात. परंतु भाजपने ही यंत्रणा मोडीत काढली आहे.

थेट मंत्रालयातून अशा प्रकार नोंदणी करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांची शिफारस आवश्यक असल्याचा घाट घातला जात आहे.

सहकार मंत्र्यांचा हा मनमानी कारभार आहे. मुळात मंत्रिपदाच्या शपथेचा हा भंग असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Atul Save : सहकार खात्याचा अजब फतवा; आता सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी भाजप जिल्हाध्यक्षाची शिफारस गरजेची?

सहकार खात्याच्या गलथान कारभारावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवू. कॉँग्रेस असे प्रकार सहन करणार नाही, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com