Water Shortage: पाणी टंचाईचं संकट होतंय गडद; जलजीवन मिशन योजना नेमकी कुणासाठी?

Jaljeevan Mission Scheme : गेली तीन वर्षे सलग अतिवृष्टी झाली असली तरी ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. एकीकडे शासनाने पाणीटंचाईचे चित्र दिसू नये म्हणून टँकरची संख्या कमी केली आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Jaljeevan Mission Scheme Update : स्वतंत्र मिळून 76 वर्ष झाली. तरीही शुद्ध पाणी सोडा, पण जसे असेल तसे पाणी मिळण्यासाठी भयंकर असे कष्ट, मेहनत करावी लागत आहेत. त्यामुळे मूलभूत गराजांमधील पाणी मिळत नसेल तर स्वतंत्र मिळून आपण काय साध्य केले असा प्रश्न पडावा अशी स्थिती दुष्काळी/कोरडवाहू परिसरातील आहे.

माझ्या गावात पाणी टाकी आहे, पण पाणी पुरवठा होत नसल्याने घरोघरी आपापल्या सोयीनुसार पाणी मिळवावे लागत आहे. फोटो पहा. हा फोटो माझ्या घरी पाणी अशा पद्धतीने मिळवावे लागते. गावातील इतरांना या नुसारच पाणी स्वतःच्या किंवा इतरांच्या बोअर मिळवावे लागते. तेही वीज असेल तर पाणी मिळते.

नाहीतर पाण्याची टंचाई खूपच भयंकर आहे. कारण बोअरवेल 700 ते 800 फूट खोल आहेत. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी कसे मिळवणार?... ही परिस्थिती माझ्या एकट्याच्या गावाची आहे असे नाही तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी आणि कोरडवाहू परिसरातील बहुतांश गावांची आहे.

गेली तीन वर्षे सलग अतिवृष्टी झाली असली तरी ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. एकीकडे शासनाने पाणीटंचाईचे चित्र दिसू नये म्हणून टँकरची संख्या कमी केली आहे. तर दुसरीकडे सतत / प्रत्येक वर्षी पाण्याचे टँकर द्या अशी मागणी करून दमल्यामुळे आपण आपली सोयीनुसार पाणी मिळावा अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतली.

Water Shortage
Water Shortage : ‘आठ दिवसांत तलाव भरून द्या, अन्यथा उपोषण करू’

स्वतःहून शासन पाणी टँकर देत नाही. तिसरे, अनेक गावांमध्ये सार्वजनिक पाणी पुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. काही गावांमध्ये पाणी टाकी आहे, तर नळ योजना नाही. काही गावात नळ योजना आहे, तर पाणी टाकी नाही. त्यामुळे गावकऱ्यांना आपपाल्या सोयीनुसार पाणी मिळवावे लागत आहे.

ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली, तर गावकऱ्यांकडून कोणत्या उपाययोजनांची मागणी होते?. तर बहुतांश गावांमधून टँकर चालू करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यास थोडेफार यश येते. हे यश ग्रामपंचायची माध्यमातून, राजकीय पुढारी-नेतृत्व , पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्था इत्यादिच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पुढाकारातून असते. पण यामुळे दीर्घकालीन उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी गावाला मोठी किंमत मोजावी लागते.

माझ्या फील्डवर्क मधून मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाणी मिळत नसतानाही जलजीवन योजनेद्वारे पाणी मिळते असे दाखवले असल्याचे दिसून आले. त्यामुळे शासनाने जरी शाश्वत पाणी पुरवठा करणारी जलजीवन मिशन ही योजना काढली असली तरीही ती केवळ कागदोपत्री असणारी एक योजना आहे.

ही योजनेतून केवळ गावात नळाद्वारे पाणी मिळत असल्याच्या नोंदी केल्या जातात. नव्याने पाणी पुरवठा किंवा पाणी जोडणी केली जात नाही. त्यामुळे वास्तवातील या योजनेची नोंदी केलेल्या गावांची उलट तपासणी करायला हवी. त्यातून वास्तव समोर येईलच.

टीप: भारत सरकारने 2024 पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन (JJM) सुरू केले. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी दिले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com