
Water Stock In Radhanagari : राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात घट असली तरी नियोजनानुसार अजूनही महिनाभर पाणी पुरेल इतका जलसाठा आहे, अशी माहिती सूत्राने दिली.
सध्या राधानगरी धरणातून ५०० क्युसेक, तुळशी धरणातून १७५ व काळम्मावाडी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सातत्याने रोज एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला तरी २५ दिवस पाणी सहज पुरेल इतका साठा आजमितीस शिल्लक आहे.
काळम्मावाडी धरणाच्या अस्तरीकरणासाठी तब्बल सहा टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा सोडल्याने या धरणात पाणी पातळी कमालीची खालावलेली आहे. मात्र व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे सद्यःस्थितीला पाणीटंचाई भासेल, अशी परिस्थिती नाही.
तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा (कंसात गतवर्षीची स्थिती)
राधानगरी धरण - २८ टक्के (३६ टक्के)
काळम्मावाडी - ११ टक्के (३१ टक्के)
तुळशी धरण - ३६ टक्के (५२ टक्के)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.