Sand Rate : सोलापुरात स्वस्तात वाळू धोरणाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त लांबला

Sand policy : वाळूच्या अवैध उपशावर प्रतिबंध घालण्यासाठी आणि सामान्यांना प्रतिब्रास केवळ ६०० रुपये दरात स्वस्तात वाळू उपलब्ध करुण देण्यासाठी राज्य सरकारने धोरण आखले.
Sand
Sand Agrowon

Sand Rate In Solapur : वाळूच्या अवैध उपशावर प्रतिबंध घालण्यासाठी आणि सामान्यांना प्रतिब्रास केवळ ६०० रुपये दरात स्वस्तात वाळू उपलब्ध करुण देण्यासाठी राज्य सरकारने धोरण आखले. त्यासंबंधीचा आदेशही काढला.

तसेच राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एक मेपासून या धोरणाची तत्काळ अंमलबजावणीचे फर्मानही सोडले. पण प्रशासनाच्या कासवगतीच्या प्रक्रियेमुळे हा मुहूर्त मात्र आता लांबणीवर पडला आहे.

राज्यातील वाळूच्या अवैध उपशावर प्रतिबंधासाठी राज्य सरकारने दूरदृष्टी ठेवून हा निर्णय घेतला. वास्तविक, या निर्णयाचे सर्वस्तरांतून स्वागत कऱण्यात आले. पण त्याच्या अंमलबजावणीबाबत मात्र प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे.

या निर्णयाने सामान्यांना स्वस्तात वाळू तर मिळणार आहेच, पण वाळूचोरांच्या मुसक्याही आवळण्याचा यातून सरकारचा प्रयत्न आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ठरावीक ठिकाणी वाळूचे डेपो तयार करण्यात येणार आहेत.

Sand
Raigad Sand Update : रायगड जिल्‍ह्यात लवकरच वाळू आगार

तिथे सामान्यांना केवळ ६०० रुपये ब्रासने वाळू मिळणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असणार आहे. कुटुंबास एकावेळी कमाल ५० मेट्रिक टन वाळू मिळेल. त्यानंतर वाळू हवी असल्यास एक महिन्यानंतर वाळूची मागणी करता येईल.

त्यासाठी महाखनिज या प्रणालीवर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. ज्यांना या माध्यमातून नोंदणी शक्य नसेल, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही नोंदणी करता येईल.

पण यासाठी आवश्यक असणारे डेपोची ठिकाणे निश्चित करणे, त्यासाठीची निविदा प्रक्रिया ही कामे सध्या प्रशासनस्तरावर सुरू आहेत.

एक मे पूर्वीच ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते, पण प्रशासनाच्या कासवगतीच्या प्रक्रियेमुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने एक मेचा मुहूर्त आता पुढे लांबला आहे. आणखी किमान २० दिवसांहून अधिक काळ यासाठी लागेल, असे सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com